- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा शंभरावा भाग होता. त्यानिमित्त पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे (Kunda Bhise) यांच्या जनसंपर्क कार्यालयात लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. या कार्यक्रमाला रहिवाशांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. तसेच, भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं होतं. त्याच्याच भाग म्हणून पिंपळे सौदागर येथे डॉ. कुंदाताई भिसे यांनी या लाईव्ह स्ट्रिमिंगचे आयोजन केले होते.
याबाबत डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या की, ३ ऑक्टोबर २०१४ हा विजया दशमीचा सण होता आणि विजया दशमीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’चा प्रवास सुरू झाला. विजया दशमी म्हणजेच, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण, ‘मन की बात’ हा देखील देशवासियांच्या चांगल्या सकारात्मकतेचा अनोखा सण बनला आहे. असाच एक सण, जो दर महिन्याला येतो, ज्याची आपण सगळे वाट पाहत असतो. तो म्हणजे पंतप्रधान मोदीजी यांचा मन की बात कार्यक्रम. या कार्यक्रमचा आज शंभरावा भाग प्रसारित झाला. त्यामध्ये पंतप्रधान मोदीजी यांनी देशवासियांना मोलाचे मार्गदर्शन केले.