वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे

वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे

राहुरी, दि.२२ (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्यातील सन्मानार्थी वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब गोपीनाथ गागरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सहसुल व पशुसंवर्धन मंत्री ना. श्री.राधाकृष्ण ए. विखे पाटील यांनी ही निवड केली.

यावेळी समितीच्या इतर सहा सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन समितीत नवनाथ साहेबराव म्हस्के, श्री.शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे, श्री. निजामभाई कासमभाई शेख, श्रीमती. राजश्री काळे, श्री. विजय वसंतराव गायकवाड, श्री. महादेव शशिकांत झेंडे यांचा समावेश करणयात आला आहे.

शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे महाराज म्हणाले, दोन वर्षापासून नगर जिल्ह्यात वृद्ध कलावंत मानधन समिती नव्हती. त्यामुळे अनेक गरजवंत युद्ध कलावंत मानधनापासून वंचित होते.आता जे जे मला भेटतील त्या सर्वांना पेंन्शन चालू करून देणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील तनपुरे घराण्यात विजय तनपूरे महाराजांचा जन्म झाला. विजय तनपूरे महाराज हे दोन वर्षाचे असतानाच त्यांना अपंगत्वाला सामोरे जावे लागले. डॉ विजय तनपुरे यांना वयाच्या दुसऱ्यावर्षी त्यांना पोलिओ झाला. वडिलांनी होते नव्हते ते विकटिक करून उपचार केले. पण काहीच फायदा झाला नाही.दरम्यान कायम अपंगत्व पदरी पडलेल्या विजय तनपुरे महाराजांनी याचा कुठलाच बोभाटा कधी केला नाही. घराला गायनाचा व इतर कलेचा कुठलाच वारसा नसताना काही दिवसात त्यांना आपल्या आवाजातील जादू आणि लकब याची ओळख झाली.