Tag: Ahmednagar

KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन 
सिटिझन जर्नालिस्ट

KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन

कर्जत : धाकट्या पंढरीत सुप्रसिद्ध अभिनेते प्रा. मनमोहनदास यांच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ब्रँड YK हॉटेलचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नगरसेविका वैशाली कांबळे राजगुरू, निर्मला खुडे, एडीसीसी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी संचालक बाळासाहेब साळुंके, बाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, विक्रम कांबळे, खंडू खुडे, येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले, वाय. के हॉटेलचे संचालक अमर काळे, सरपंच अशोक जायभाय, परशुराम जायभाय यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता कर्जतकरांना हॉटेल वाय. के.च्या माध्यमातून अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. उत्कृष्ट सेवा, स्वच्छता व क्वालिटी हे हॉटेल ...
प्रा. राजेंद्र गायकवाड यांची ‘प्रविण प्रशिक्षक’पदी नियुक्ती
यशोगाथा

प्रा. राजेंद्र गायकवाड यांची ‘प्रविण प्रशिक्षक’पदी नियुक्ती

अहमदनगर, ता. २३ : ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये प्रा. राजेंद्र गायकवाड यांची ' प्रविण प्रशिक्षक ' (Master trainer) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शाश्वत विकास संकल्पना अंतर्गत केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाकडून राज्य ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटी करणासाठी त्यांच्याकडे कार्यभार असणार आहे. राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा, पुणे या शासनाच्या संस्थेत त्यांचे प्रशिक्षण झाले आहे. निवेदक, सूत्रसंचालक व व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध असलेले प्रा. राजेंद्र गायकवाड हे अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांचा सर्वांनाच विशेष फायदा होईल. अशी जनसामान्यांकडून भावना व्यक्त करण्यात येत आहे....
चांदे बुद्रुक विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमनचा सत्कार
महाराष्ट्र

चांदे बुद्रुक विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमनचा सत्कार

कर्जत (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : चांदे बुद्रुक विकास सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन संतोष नवले, व्हाईस चेअरमन दादा किसन जगताप आणि युवा नेते नंदकुमार नवले यांचा चांद मुजावर, अमोल खोमणे व ग्रामपंचायत सदस्य नितीन जगधने मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी रामदास थोरात, नामदेव सूर्यवंशी, बाप्पू नवले, बंडू सूर्यवंशी, माजी चेअरमन रामदास नवले, अण्णा कांतीलाल नवले, तेजस नवले, बाळासाहेब जगताप, विशाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते....
बिबट्याच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी दिवसा वीज?
महाराष्ट्र, मोठी बातमी

बिबट्याच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी दिवसा वीज?

पालकमंत्री हसन मुश्रीफ करणार ऊर्जामंत्र्यांशी चर्चा अहमदनगर : जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करुन घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळण्यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यावेळी कोरोना प्रादुर्भाव व संभाव्य दुसरी लाट, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेले नुकसान व मदतवाटप, जिल्ह्यात बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर आणि त...
मिरजगावातील १३ रूग्णांसह कर्जत तालुक्यात सापडले २५ कोरोना रूग्ण | बेशिस्त नागरिकांमुळे वाढतेय संख्या
महाराष्ट्र

मिरजगावातील १३ रूग्णांसह कर्जत तालुक्यात सापडले २५ कोरोना रूग्ण | बेशिस्त नागरिकांमुळे वाढतेय संख्या

अहमदनगर : कोरोना नियंत्रणासाठी शासनाने घालून दिलेले नियम नागरिकांकडून पाळले जात नाहित. त्यामुळे कर्जत तालुक्यात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस भर पडत आहे. आज (ता. २३ ऑक्टोबर) एकुण २५ कोरोना (कोविड-19) रूग्ण सापडले. आजमितीस तालुक्यातील कोरोना रूग्ण संख्या १७०८ झाली असून त्यापैकी १४७० रूग्ण बरे झाले आहेत. तर २१५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. मिरजगावात वाढतेय संख्या मिरजगाव हे तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठे असलेले गाव असल्याने दररोज मोठी वर्दळ याठिकाणी असते. मात्र, सोशल डिस्टसिंग, मार्क, हाताची स्वच्छता आदी सुरक्षेच्या बाबींकडे नागरिक, व्यावसायिक, सरकारी तसेच खासगी कार्यालयातील व बँकेतील कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मिरजगावात कोरोना रूग्णांची ...
#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन १९ कोरोना बाधित रूग्ण
महाराष्ट्र

#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन १९ कोरोना बाधित रूग्ण

अहमदनगर : कर्जत तालुक्यात आज (ता. २१ ऑक्टोबर) एकुण १९ कोरोना (कोविड-19) बाधित रूग्ण सापडले. आजमितीस १६७२ कोरोना रूग्ण संख्या झाली असून त्यापैकी १४५४ रूग्ण बरे झाले आहेत. तर १९५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. गावानुसार आज सापडलेले रूग्ण : 1.ताजु-01 2.चापडगाव-01 3.मिरजगाव- 09 4.बाभूळगाव खालसा-02 5.कोकणगाव-01 6.थेटेवाडी-01 7.करपडी-01 8.कर्जत-03...
मोठी बातमी, ताज्या घडामोडी, महाराष्ट्र

#COVID-19: कर्जतमध्ये १३ आरोपीसह ४२ जण कोरोना बाधित

अहमदनगर : कर्जत तालुक्यात बुधवारी ४२ रूग्ण कोरोना (covid-19) सापडले आहेत. त्यामध्ये सबजेलमधील १३ आरोपींचा समावेश आहे. रविवारी (ता. २७) कर्जत पोलिस ठाण्यातील सात पोलिस तर राशीन पोलिस ठाण्यातील एक पोलिस कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्याअनुषंगाने सबजेलमधील १९ आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा आरोपी कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, कर्जत तालुक्यात एकुण १३३३ कोरोना रूग्णांपैकी १०६२ रूग्ण बरे झाले असून २४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजतागायत २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रूग्णांचा गावानुसार तपशील खालीलप्रमाणे : 1.कर्जत-04 2.दुरगाव-03 3.कुळधरण - 01 4.चापडगाव - 02 5. खांडवी- 01 6.नेटकेवाडी - 01 7.निमगाव गांगरडा-02 8.अळसूनदे-04 9.मिरजगाव-02 11.चिंचोली काळदात-02 12.राशीन-01 13.बहिरोबावाडी-02 14.रुईगव्हान-01 15.सितपु...