Tag: IPS Krishna Prakash

पिंपरी चिंचवड पालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या आशीर्वादाने शहरात अवैध वृक्षतोड सुरू आहे का?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड पालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या आशीर्वादाने शहरात अवैध वृक्षतोड सुरू आहे का?

पिंपरी, ता १३ : पिंपरी चिंचवड शहरात दिवसाढवळ्या वूड माफिया ट्रक घेऊन रस्त्यावरील झाडं तोडत असतात आणि पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे मुग गिळून केलेल्या तक्रारींवर गप्प आहेत. असा सवाल वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केला आहे. निगडी येथील यामुनानगरमध्ये फोटोतील व्यक्ती अवैधरित्या वृक्षतोड करताना ऋषिकेश तपशाळकर यांना दिसला. ते बघताच त्यांनी त्याला हटकले आणि वृक्षतोडीची परवानगी मागताच तो तिथून पळून गेला. त्यामुळे पोलीस आणि पालिका आयुक्त अवैध वृक्षतोडीला संरक्षण देत आहेत का? आणि नाही तर इतक्या तक्रारी करून देखील दुर्लक्ष का केले जात आहे? टेम्पोचा नंबर वैध आहे का? आणि ही लाकडं जातात कुठं? कोण आहे माफिया, जो दोन्ही आयुक्तांनावर दबाब टाकत आहे? असे अनेक प्रश्न वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केले आहेत....
Crime News : दुचाकी चोरून वेगवेगळ्या जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी केला पर्दाफाश ; ६१ दुचाकी हस्तगत
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Crime News : दुचाकी चोरून वेगवेगळ्या जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी केला पर्दाफाश ; ६१ दुचाकी हस्तगत

पिंपरी, ता. १६ : चिखली, पिंपरी, निगडी अशा शहरातील दुचाकी वाहनांची चोरी करुन खानदेश व मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे हि टोळी मौजमजा करण्यासाठी वाहन चोरुन त्या वाहनांची बनावट कागदपत्र तयार करुन ती वाहने विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत याबाबत माहिती दिली. पोलीसांनी या टोळीकडुन एकुण ६१ दुचाकी वाहने असा एकुण १९ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोविंद मुलचंद सोलंकी (वय - २५, सध्या रा. अंजिठा नगर, पत्र्याचे शेड चिंचवड, मुळगाव-छाप्रा पोस्ट छोटाटिगरीया, ता. जि. देवास, मध्यप्रदेश), संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय- २८, रा. गोकुळ हौसिंग सोसायटी, यादव यांचे घर, मोरेवस्ती, चिखली), सद्दाम अब्दुल शेख (वय- २६, रा. ताम्हाणे वस्ती, विठ्ठल ...
दोन खुनाच्या गुन्ह्यातील नातेवाईकाच्या मदतीने सुनेनेच काढला सासुचा काटा | मृतदेहाची लावली विल्हेवाट
पिंपरी चिंचवड

दोन खुनाच्या गुन्ह्यातील नातेवाईकाच्या मदतीने सुनेनेच काढला सासुचा काटा | मृतदेहाची लावली विल्हेवाट

रहस्यमय खुनाचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट - २ ने केला उलगडा पिंपरी : सासुचा खुन करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या सुनेला तिच्या नातेवाईकाला गुन्हे शाखा युनीट - २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या नातेवाईकावर दोन खुन केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पॅरलवर बाहेर आहे. कोणताही ठोस पुरावा हाती नसताना गुन्हे शाखा युनीट - २ च्या पथकाने या खुनाचा उलगडा केला आहे. पथकाच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक करुन पथकाला ४० हजाराचे बक्षिस जाहीर केले आहे. इम्तियाज उर्फ चिंट्या मुस्ताक शेख (वय - २५, रा. फाजीमा मस्जिद जवळ, ओटास्किम, निगडी) असे खुन केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. तर आरोपी सुन ही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. सोजराबाई दासा जोगदंड ( वय- ७०, रा. उर्दु शाळेजवळ, लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे ) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे...
डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनतर्फे जागतिक पुरस्कार
शैक्षणिक, पुणे

डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनतर्फे जागतिक पुरस्कार

पुणे : गॅलॅक्सी ग्रुप आणि गॅलॅक्सी युथ फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् पुरस्काराने गौरविण्यात आले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते येथे नुकताच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. https://youtu.be/ViDKbEVKKnc वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन तर्फे जगभरातील देशांमध्ये ग्लोबल प्लेज कॅम्पेन हा उपक्रम सुरु आहे. या अंतर्गत कोरोनाच्या काळात आणि त्या अगोदर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जागतिक स्तरावर केला जात आहे. याच अनुशंगाने डॉ. दत्तात्रय लोखंडे यांच्या कोरोनाच्या काळात आणि त्या आधीपासूनच सेवाभावी कामाची दखल घेत जागतिक स्तरावरील पुरस्काराने त्यांना...
कुप्रसिद्ध 14-12 (KR) टोळी आणि अट्टल घरफोडी चोर ‘जयड्या’च्या भोसरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पिंपरी चिंचवड

कुप्रसिद्ध 14-12 (KR) टोळी आणि अट्टल घरफोडी चोर ‘जयड्या’च्या भोसरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंपरी चिंचवड : भोसरी परीसरात कुप्रसिद्ध असलेली 14-12 (KR) किरण राठोड टोळी आणि घरफोडीत शंभरीच्या उंबरठ्यावर असलेला अट्टल घरफोड्या चोर जयवंत उर्फ ‘जयड्या’ गोवर्धन गायकवाड याच्या भोसरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडुन 200 ग्रॅम सोन्याच्या व 200 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 10 लाख 39 हजार 135 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परीसरात कुप्रसिद्ध असलेल्या KR टोळीचा म्होरक्या किरण गुरुनाथ राठोड ( वय- 23 वर्ष सध्या रा. साईबाबा मंदिर जवळ, दिघी, मुळगाव मु.पो. शाहपुर, ता. गुलबर्गा जि. गुलबर्गा), भगतसिंग सुरजसिंग भादा ( वय- 19 वर्ष रा. आदर्शनगर, शिव कॉलनी, गणेश मंदिर मागे, दिघी) करण राठोड आणि अभिषेक नलावडे यांनी दिघी रोड येथील एका चिकनच्या दुकानात शिरुन दुकान मालकाच्या गळ्याला कोयता...
सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला हा निर्णय
पिंपरी चिंचवड

सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला हा निर्णय

पिंपरी : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या भेटीसाठी अनेक राजकीय व्यक्ती, पदाधिकारी, नागरिक गर्दी करत आहेत. पोलीस आयुक्तालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्तांच्या सदिच्छा भेटीसाठी येऊ नये, असे फर्मान त्यांनी जनसंपर्क अधिकारीद्वारे देण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना भेटण्याचा अनेक जण आपापल्या परीने आटापिटा करत आहेत. फोटोसाठी मास्क न घालता, सोशल डिस्टसिंगचेही तीनतेरा वाजवताना दिसत आहेत. त्यामुळे हे सर्व पाहता शिस्तप्रिय कृष्ण प्रकाश यांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे लक्ष्यात येताच नागरिक आणि इतर राजकीय व्यक्तींनी सदिच्छा भ...