Tag: Jet Jagdish

‘तर्कटपंजरी’ : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक
विशेष लेख

‘तर्कटपंजरी’ : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक

जगदीश काबरे हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की हे जग अस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्याचप्रमाणे या अस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते. स्त्री म्हणजे पापयोनी समजणारे नास्तिक म्हणजे दुर्जन समजत असतात. पण मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात स्त्रियांनी शेतीचा शोध लावून माणसाच्या सामाजिक प्रगतीचा मार्ग खुला केला त्याचप्रमाणे चार्वकांनी देव आणि पारलौकिता नाकारून वैदिक धर्माला आव्हान दिले आणि वैज्ञानिक प्रगतीचा पाया घातला. पण माणसाला अज्ञाताची भीती असल्यामुळे कुठल्यातरी फसव्या का होईना पण आधाराची गरज लागते. ती गरज सहजपणे देवाची संकल्पना पूर्ण करते. म्हणून त्याला माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 'देवाची करणी आणि नारळात पाणी' या पद्धतीचे स्वीकारणे सोयीचे जाते. माणसाला विचार करण्याचा आळस असतो. तसेच तो ...
सुशिक्षित की फक्त शिक्षित? – जेट जगदीश
विशेष लेख

सुशिक्षित की फक्त शिक्षित? – जेट जगदीश

आज साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आहे असं म्हणतात. आपल्या लक्षात येईल की, आपण साक्षर जरूर आहोत; पण अडाणी सुशिक्षित आहोत. वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या अभावामुळे भाज्याफळे धुतल्यानंतरचे आणि स्वयंपाक घरातील भांडी विसळलेले पाणी पिण्यायोग्य नसले तरी झाडांना पोषक असते; ह्याची जाण नसल्यामुळे असे पाणी झाडांना देणे म्हणजे झाडांना निसत्व करणे आहे असे समजले जाते. ते पाणी डास वाढीस कारणीभूत ठरते, या समजापोटी सोसायटीतील शिक्षित मंडळी सोसायटीच्या आवारातील झाडांना ते पाणी घालण्यास विरोध करतात. विद्युत निर्मितीसाठी पाण्याची गतिज ऊर्जा वापरून टरबाईन फिरवले जातात आणि नंतर जे पाणी बाहेर पडते त्या पाण्यातील ऊर्जा काढून घेतल्यामुळे ते उर्जाहीन पाणी शेतीला देणे किंवा झाडाला देणे उपयोगाचे नाही, असे समजणे जेवढे हास्यास्पद तेवढेच सोसायटीमधील झाडांना भांडी विसळल्यानंतरचे, तांदूळ वा भाज्याफळे धुतल्यानंतरचे पाणी झाडा...
राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश
विशेष लेख

राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण करून महाराष्ट्रात भाजपेईंनी मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना 'जोडे मारो' (Bharat Jodo Yatra) कार्यक्रमही राबवला. या कार्यक्रमासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात आंदोलनकर्तीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) जोडे मारण्याच्या ऐवजी सावरकरांवरच जोडे मारण्यासाठी हात उगारला होता असे हास्यास्पद चित्र दिसले. बरे तर बरे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी तिला ताबडतोब अडवले म्हणून. नाहीतर बिचाऱ्या सावरकरांची काही धडगत नव्हती. त्यांनाच चपलांचा मार बसला असता. याचा अर्थ भाजपने सावरकर आणि राहुल गांधी यांना ओळखता न येणारे भाडोत्रीआंदोलनकर्ते मागवले होते की काय? दुसरे म्हणजे सावरकरांच्या (V D Savarkar) विरोधात मोठ्या प्रमाणात जाहीरपणे वक्तव्य करणे केव्हा सुरू झाले याबद्दल भाजपने जरूर चिंतन करायला हवे. 2014 पूर्वी सावरकरांविषयी अशा पद्धतीने गे...
पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश 
विशेष लेख, मनोरंजन, मोठी बातमी

पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश

'हर हर महादेव' हा (Har Har Mahadev 2022) चित्रपट म्हणजे एकूण सगळा विनोदच आहे. पण ते तसेच सोडून देऊन चालणार नाही. कारण या चित्रपटाचे निर्माते हे हिंदुत्ववादाने भारलेले धर्मांध आहेत आणि नवीन पिढीमध्ये आपल्या सोयीचा इतिहास लिहून चुकीचा संस्कार रुजवण्यात हातभार लावणारे आहेत. त्यामुळे त्यांना योग्य वेळी धडा शिकवलाच पाहिजे. पण या चित्रपटात मांजरेकरचा मुलगा कोवळा दिसतो म्हणून त्याची खिल्ली उडवणे मात्र योग्य नाही. कारण 'पुरुष म्हणजे मर्द' अशी जी एकूण पुरुषाची प्रतिमा तयार केली गेलेली आहे तीच मुळात चुकीची आहे. आज आपण अशा चुकीच्या कल्पनांमुळे कोवळ्या दिसणाऱ्या पुरुषाची खिल्ली उडवतो, हे तर त्याहूनही असंस्कृतपणाचे लक्षण आहे. एकूण जगभर पुरुषसत्ताक अवस्था घट्ट रुजवताना स्त्री आणि पुरुषांना विशिष्ट चौकटीत अडकवले गेले आहे. कारण माणूस जेव्हा शेती करू लागला आणि एका जागी स्थिर झाला तेव्हा स्त्रीला बाळंतपण...
पक्षपातीपणा कोण करतंय, मुस्लिमद्वेष्ट्ये हिंदुत्ववादी की प्रदूषण नियंत्रण मंडळ?
विशेष लेख

पक्षपातीपणा कोण करतंय, मुस्लिमद्वेष्ट्ये हिंदुत्ववादी की प्रदूषण नियंत्रण मंडळ?

जेट जगदीश 'प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन' 23 ऑगस्टच्या लोकसत्तेतील या बातमीत, 'पाच वेळा मशिदीच्या भोंग्यांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते आणि केवळ हिंदूंच्या सणाच्या वेळी प्रदूषण होते असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वाटते. त्यामुळे ते फक्त हिंदूंच्या विरोधात पक्षपाती कारवाई करतात. म्हणून त्यांनी हिंदूंवर 230 खटले आणि मुसलमानांवर 22 खटले भरले. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा.' असा आरोप केल्याचे वाचले. पण भारतातील लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार खटल्यांचे प्रमाण अगदी योग्य आहे. कारण महाराष्ट्रात काय की भारतात काय हिंदूंची संख्या सुमारे 80 टक्के आणि मुसलमानांची संख्या 14 टक्के आहे. खटल्यांचे प्रमाणही जवळपास तेवढेच भरते. याचा अर्थ प्रदूषण मंडळाचे लोक कुठल्याही प्रकारे पक्षपात करत नाहीत, हेच सिद्ध होत नाही काय? तसेच DJ कधीतरीच ...
3 जानेवारी: सावित्रीबाई फुले जन्मदिन – जगदीश काबरे
विशेष लेख

3 जानेवारी: सावित्रीबाई फुले जन्मदिन – जगदीश काबरे

सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीयांना दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आणि स्वातंत्र्याचा कानमंत्र यामुळे त्यांचं जगणं बदलेल, शिक्षणामुळे त्या विचार करू लागतील, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला लागतील,एवढंच नाहीतर या समाजात त्यांना पुरूषांच्या बरोबरीनं स्थान मिळेल अशी स्वप्ने गेली काही वर्षे आपण पहात आहोत. पण… तरीही वर्तमानपत्रांतून रोज तिच्यावरच्या वेगवेगळ्या अत्याचाराच्या बातम्या येताहेत. यावरून हेच सिध्द होतं की, अजुनही स्त्रीला केवळ मादी समजणाऱ्या समाजाची मानसिकता बदललेली नाही. पुरूषाची मानसिकता ज्या प्रमाणात शिक्षणामुळे बदलायला हवी होती त्या प्रमाणात बदलली नाही, हे सत्य आहेच, पण स्त्रीची मानसिकता तरी कुठे बदलली आहे? स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला कळला आहे का? परंपरा आणि संस्कृतीचा नेमका काय अर्थ लावताहेत त्या? आज कार्पोरेट क्षेत्रात लिलया वावरणारी स्त्री जेव्हा मार्गशीर्...
भावना दुखावण्याचा रोग
विशेष लेख

भावना दुखावण्याचा रोग

जेट जगदीश हल्ली कुणी धर्म चिकित्सा करायला लागले की, धर्मअंध लोक 'आमच्या भावना दुखावल्या.' अशी कोल्हेकुई सुरू करतात. पण भावना दुखावणे हे प्रकरण तसे चार्वाक काळापासूनचे जुनेच दुखणे आहे. 👉तुकारामांच्या अभंगांनी जेव्हा धर्मातील भोंदूगिरी आणि कर्मकांडावर प्रहार केले, तेव्हा मांबाजी भटासारख्या लोकांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी तुकारामांचा आयुष्यभर छळ केला आणि शेवटी सदैव वैकुंठाला पाठवले. 👉नामदेवांनी जेव्हा कुप्रथा आणि रुढींवर त्यांच्या अभंगातून ताशेरे ओढले तेव्हाही सनातन्यांच्या भावना दुखावल्या. परिणामी सनातन्यांनी केलेल्या छळामुळे त्यांना महाराष्ट्र सोडावा लागला. 👉राजाराम मोहन रॉय यांनी सतीची चाल बंद व्हावी म्हणू कायदा करण्याचा दबाव ब्रिटिशांवर आणला, तेव्हाही बंगाली ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या, आणि त्यांच्या विरोधात गरळ ओकायला सुरवात केली. ...
अफवा पसरवणाऱ्या पोथ्या – जेट जगदीश
विशेष लेख

अफवा पसरवणाऱ्या पोथ्या – जेट जगदीश

जेट जगदीश अफवा पसरवणे जर गुन्हा आहे, तर व्रत आणि उपवासाच्या ज्या पोथ्या आहेत त्यातील खोटा आशावाद पसरवणाऱ्या भाकड कथा या अफवा नाहीत का? सत्यनारायण कथा, लक्ष्मीव्रत कथा, संतोषी माता व्रत कथा, सोळा सोमवार, सोळा गुरुवार, सोळा शुक्रवार च्या पोथ्या अफवा नाहीत का? कारण त्यात सांगितल्याप्रमाणे भक्तांच्या मनोकामना कधीच पुऱ्या झालेल्या आजतागायत दिसल्या नाहीत. मग ह्या पोथ्या लिहीणाऱ्या लेखकांनी अफवा पसरवण्याचा गुन्हा केला नाही काय? पोथी वाचणार्‍या भक्तांकडे क्वचितच धनधान्य, समृद्धी आली असेल. पण पोथी न वाचणाऱ्या या प्रकाशकांनी धर्माच्या नावाखाली पोथीच्या आधारे कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाने मात्र खोऱ्याने पैसे ओढून स्वतःचे मात्र कल्याण केले! या पोथ्यातील कथांना खरे समजल्यामुळे प्रत्यक्षात नरबळी दिले गेले आणि अनेक भक्तांनी ही व्रते वा पूजा केल्यामुळे मिळणाऱ्या मोक्षाच्या अफवांमुळे आत...