महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन – बाळासाहेब थोरात
राज्यातील भाजप नेत्यांची निष्ठा महाराष्ट्राशी नाही, दिल्लीतील भाजप नेत्यांसोबतभाजप नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह करू नये
मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत, या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून ह्या आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा
या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, 'कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका मांडली होती, पण त्य...