Tag: Marathi News

शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षा पदी शैला पाटील 
मनोरंजन

शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षा पदी शैला पाटील

पिंपरी (Lokmarathi News) : शिवसेना (शिंदे गट) चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या महिला शहराध्यक्षा पदी शैला चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेना उपनेते व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, शहर संघटीका सरिता साने आदी उपस्थित होते. शैला पाटील यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहेत. त्यामध्ये प्रेमरंग, बिंडी, सर्जा, तांडव सिरिअल दख्खनचा राजा, ऐकविरा आई, वेबसिरिज प्रेमाच्या पलिकडे या प्रमुख चित्रपट व सिरीयल मध्ये कामे केलेल्या असल्यामुळे शैला पाटील यांची पिंपरी चिंचवड शहराच्या शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाला शैला पाटील यांचा संघटना बांधण्यासाठी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. ...
गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्ते दुरुस्त करा – रुपेश मोरे
पुणे

गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्ते दुरुस्त करा – रुपेश मोरे

पुणे (Lokmarathi) : जुलै महिण्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भुस्सखलनाच्या घटना घडल्या. अनेक रस्ते, ओढ्या, नाल्यांवरील पुल वाहुन गेले. यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले होते. 19 सप्टेंबर पासून सुरु होणा-या गणेशोत्सवासाठी पुणे - पिंपरी चिंचवड मधून लाखो नागरीक कोकणात जातील. त्यांना जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील एकमेव रस्ता सोयीस्कर आहे. परंतू मागील महिण्यातील पावसामुळे या रस्त्याची दूरावस्था झाली आहे. गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्त्यांची कामे युध्द पातळीवर पुर्ण करावीत अशी मागणी कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. कोकण खेड युवाशक्तीच्या वतीने मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, पुणे...
मोठ्या यूएस स्पर्धा खेळू शकला नसलेला नोव्हाक जोकोविच परत येण्यास उत्सुक
क्रीडा

मोठ्या यूएस स्पर्धा खेळू शकला नसलेला नोव्हाक जोकोविच परत येण्यास उत्सुक

लोकमराठी न्यूज : नोव्हाक जोकोविच म्हणाला की, तो युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठ्या स्पर्धांमध्ये खेळू शकला नाही आणि बुधवारी सिनसिनाटी ओपनमध्ये दोन वर्षांतील त्याच्या पहिल्या एकेरी सामन्यात सहज विजय मिळविल्यानंतर परत आल्याने आनंद झाला. 23-वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियनला गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्याने कोविड-19 लस घेण्यास नकार दिल्याने यूएसमध्ये स्पर्धा करण्याची परवानगी नव्हती, परंतु यूएस सरकारने मे मध्ये लसीकरण न केलेल्या परदेशी प्रवाशांसाठी त्याचे नियम शिथिल केल्यानंतर तो परत आला. 2019 नंतर प्रथमच सिनसिनाटीमध्ये एकेरी खेळताना, 36 वर्षीय सर्बियनने अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिनाविरुद्ध पहिला सेट 6-4 असा जिंकला, जो नंतर पाठीच्या समस्येमुळे निवृत्त झाला. "वेळ निसटून जाते. चार वर्षे कालच वाटत होती. त्यामुळे परत येणे निश्चितच आनंददायी आहे, असे जोकोविचने पत्रकारांना सांगितले....
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन 
शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन

हडपसर, ता. १७ ऑगस्ट २०२३ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपच्या अंतर्गत मुलांना कॉस्मॅटिकस मध्ये वापरले जाणारे २० हुन अधिक वनस्पतींची माहिती आणि त्याचा उपयोग सांगण्यात आला. भारत देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या महत्त्वाच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती आणि दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल याचे प्रशिक्षण वर्कशॉप मध्ये देण्यात आले. कोरफड, हळद, चंदन, यापासून साबण बनवण्याचे प्रशिक्षण त्याचबरोबर शिककाई पासून शाम्पू बनवण्याचे प्रशिक...
बाईपण भारी देवा….! विशेष मुलांच्या माता-भगिनींसाठी सप्तर्षी फाउंडेशनच्या संकल्पनेतून सहलीचे आयोजन
सामाजिक

बाईपण भारी देवा….! विशेष मुलांच्या माता-भगिनींसाठी सप्तर्षी फाउंडेशनच्या संकल्पनेतून सहलीचे आयोजन

पिंपरी (लोकमराठी) : विशेष ( दिव्यांग )मुलांच्या मातांवर व भगिनींवर विशेष मुलांना सांभाळण्याची मुख्यत्वे जबाबदारी असते. त्यांच्या दैनंदिन जीवनातून त्यांचे स्वतःसाठी एक दिवस त्यांना मुक्तपणे संवाद व संचार करण्यासाठी मिळावा म्हणून विशेष मुलांच्या माता व भगिनींसाठी सदर सहलीचे आयोजन अंजनवेल कृषी पर्यटन मुळाशी, पुणे येथे दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते. सदर उपक्रमांतर्गत जवळपास अनेक विशेष मुलांच्या माता आणि बहिणींचा संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषण मुक्त वातावरणात, आनंदात तसेच चविष्ट व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत पार पडला. विशेष ( दिव्यांग )मुलांच्या मातां व भगिनी यांनी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे व कुंदाताई भिसे यांचे मनापासून आभार मानले. अनेक महिला आयोजकांचे व व्यवस्थापकांचे आभार मानताना भावुक झाल्या, वर्षातले 365 दिवस कुटुंबासाठी देत असताना एखादा द...
विविध उपक्रमाद्वारे नाना काटे यांचा वाढदिवस साजरा; शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची दिवसभर मांदियाळी
पिंपरी चिंचवड

विविध उपक्रमाद्वारे नाना काटे यांचा वाढदिवस साजरा; शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची दिवसभर मांदियाळी

चिंचवड, दि. १६ ऑगस्ट : माजी विरोधी पक्षनेते व युवा नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा वाढदिवस देशाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना काटे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या Pimple Saudagar येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर दिवसभर मोठी गर्दी केली होती. खासदार श्रीरंगआप्पा बारणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, कविता अल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, शाम लांडे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, पंकज भालेकर, निलेश डोके, राहुल भोसले, विक्रांत लांडे, संतोष कोकणे, विनोद नढे, संजय वाबळे, प्रभाकर वाघेरे, सुनील गव्हाणे, समीर मासुळकर, सुलक्षणा शीलवंत, माई काटे, माई काळे, प्रज्ञा खानोलकर, खंडूशेठ कोकणे, प्रसाद शेट्टी, हभप प्रमोद महाराज जगताप, हभप पुरुषोत्तम म...
एल.बी. टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
शैक्षणिक

एल.बी. टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

काळेवाडी (लोकमराठी न्यूज) : श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एल बी टी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण सुभेदार शंकरराव बळवंतराव शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश विटकर, हे होते. प्रमुख पाहुणे हवालदार अरुण आंब्रे, सज्जी वर्गीस, सागर तापकीर, सुनिल पारखे, सुरेश हागवणे साहेब , मोहन तापकीर राजू पवार , शांताराम भोंगाळे,अशोक हजारे, एकनाथ काटे , जगदिश दत्तात्रय काटे, संजय गायके, रामकिसन वढणे, दिलीप वढणे, शहा, डी.एस. सोनार, नवनाथ थोरात, दत्तात्रय भुजबळ,मिठूभाई शेख, रामलिंग कंठेकर, प्रकाश मुरकुटे, मनोहर मोरे, दिलीप मुळे, माधव दंडीमे, नरेंद्र हेडाव , राजाराम पवार, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विलास निकम, मनोहर इंगोले, हसन पटेल, सुनिल पार्टे, सुरेश पाटील, विद्यादर आबाने, विपूल मलशेट्टी, कुंद...
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या सहलीमुळे त्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमगले
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या सहलीमुळे त्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमगले

दिव्यांगांच्या उन्नतीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन सदैव प्रयत्नशील - डॉ. कुंदाताई भिसे पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२३) : स्व. राहुल शामराव जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू ओंकार जोशी आणि पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र येथे विशेष (दिव्यांग) मुलांच्या माता आणि भगिनींसाठी नुकतेच विनामूल्य एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीस पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत मोठ्या संख्यने विशेष मुलांच्या माता आणि भगिनींनी संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषणमुक्त वातावरणात आणि आनंदात घालवला. तसेच तसेच चविष्ट व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, ओंकार जोशी, अंजनवेल कृषी पर्यटनचे राहुल जगताप, सप्त...
Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
महाराष्ट्र, ताज्या घडामोडी, मोठी बातमी

Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

पुणे (लोकमराठी न्यूज) : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने स...
पोलीस हवालदार योगेश ढवळे यांचे अपघाती निधन 
क्राईम

पोलीस हवालदार योगेश ढवळे यांचे अपघाती निधन

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : हवालदार पदावर कार्यरत असलेले योगेश ढवळे (वय ४०) यांच्या दुचाकीला हायवा वाहनाने धडक दिल्याने त्यांचे अपघाती निधन झाले. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास चाकण येथे घडली. ते चाकन वाहतूक विभागात कर्तव्यावर होते. मिळालेल्या माहितीनुसार, ढवळे (Yogesh Dhawale) यांना आज (दि. ०८ ऑगस्ट २०२३) चाकण वाहतूक विभागाच्या अंतर्गत माणीक चौक येथे सकाळी आठ ते रात्रौ नऊपर्यंत कर्तव्यास नेमण्यात आले होते. ते सकाळी दहाच्या सुमारास पंचप्रण शपथ घेण्याकरीता ते त्यांचे मोटार सायकल (क्रमांक एम.एच.१४ सी.एफ. ६४८०) वरुन चाकण वाहतूक विभागाकडे येत असताना एच.पी. पेट्रोल पंपासमोर हायवा (क्र. एम.एच. १४ जे.एल. ९९३६) वरील चालकाने त्यांचे मोटार सायकलला धडक दिल्याने त्यामध्ये पो. हवालदार ढवळे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. ...