Tag: Marathi News

नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला 
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला

लोकमराठी न्यूज नेटवर्क | १ जुलै २०२३ बुलढाणा : येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, तिला का...
YCM : वायसीएम रूग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 
पिंपरी चिंचवड

YCM : वायसीएम रूग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

पिंपरी : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय (वायसीएम) प्रवेशद्वारावर अल्पसंख्यांक विकास महासंघ, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी व शहाजमात यांच्यातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते. याआंदोलनाची दखल गेत वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. संजय वाबळे यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी झालेल्या चर्चेत जनतेच्या तक्रारी बद्दल जास्त जोर देण्यात आला. त्यामध्ये बाहेरील औषध गोळ्या व डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल चर्चा करण्यात आली. (YCM Hospital) वायसीएम रूग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वायसीएम प्रशासनाला देण्यात आला. https://youtu.be/z0H8SOM9IZk यावेळी अल्पसंख्यांक विकास महासंघचे संस्थापक अध्यक्ष रफिक भाई कुरेशी, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्याम कुमार कसबे, युवा अध्यक्ष साजिद शेख, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे पि...
सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शैक्षणिक, सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानी नंबर-१ (ता. खेड, जिल्हा रत्नागिरी) मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या हेतूने सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, दीप्ती यादव मॅडम, शिक्षण समिती अध्यक्ष शिंदे साहेब, उपाध्यक्ष बुमरे ताई, उद्योजक विपुल मोरे, स्वप्नील मोरे व यश दळवी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला....
‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोदी @ ९ कार्यक्रमाचे पिंपळे सौदागरमध्ये थेट प्रक्षेपण
पिंपरी चिंचवड, राजकारण

‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोदी @ ९ कार्यक्रमाचे पिंपळे सौदागरमध्ये थेट प्रक्षेपण

चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे यांचा उपक्रम देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी पंतप्रधान मोदींचा व्हर्च्युअल संवाद पिंपरी (दि. २७) : केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज मंगळवारी (दि. २७) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेरा बूथ, सबसे मजबूत' मोदी @ ९ या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संघटनात्मक मंडळे आणि बूथवर देशभरातील सुमारे दहा लाख भाजप कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधत त्यांना संबोधित केले. भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शहर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी...
KATRAJ : अजिंक्य भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने भंडी शेगावात दिंडी पंगत संपन्न
सामाजिक

KATRAJ : अजिंक्य भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने भंडी शेगावात दिंडी पंगत संपन्न

पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : आषाढी वारी निमित्ताने पंढरपूरच्या भक्ती यात्रेत पायी चालणाऱ्या ज्ञानोबा माऊलींच्या रथापुढील दिंडी क्रमांक 97 च्या वैष्णव भक्तांसाठी कात्रज मधील अजिंक्य भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने भंडी शेगाव या गावी पंगत संपन्न झाली. कात्रज ग्रामस्थांच्या वतीने गेले 50 ते 60 वर्षांपासून या दिंडीसाठी पंगत सेवा रुजू करण्याची परंपरा आहे. जुन्या जाणत्यांच्या मार्गदर्शनात आज कात्रज गावची चौथी पिढी ही सेवा रुजू करत आहे. भंडी शेगाव येथे संपन्न झालेल्या पंगतीच्या निमित्ताने, दिंडी क्रमांक 97 चे अध्यक्ष ह.भ.प. भाऊ महाराज परांडे, उपाध्यक्ष योगेश कदम यांनी दिंडीच्या वतीने मंडळाचा अध्यक्ष या नात्याने प्रतिक कदम यांचा सत्कार केला. या मंडळाचे संस्थापक सुरेश कदम आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय सुरेश कदम, प्रभाकर बाबा कदम, किसन आण्णा जेधे, आप्पासाहेब गायकवाड, सं...
केरळमधील YouTubers चे वार्षिक उत्पन्न ₹2 कोटींपर्यंत ; प्राप्तिकर छाप्यांमध्ये 25 कोटींचा घोटाळा उघड
राष्ट्रीय, मोठी बातमी

केरळमधील YouTubers चे वार्षिक उत्पन्न ₹2 कोटींपर्यंत ; प्राप्तिकर छाप्यांमध्ये 25 कोटींचा घोटाळा उघड

मुंबई, ता. 27 : आयकर (आयटी) विभागाने केरळमधील कोची आणि कोझिकोड भागातील लोकप्रिय यूट्यूबर्सच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. वृत्तानुसार, आयटी विभागाने शुक्रवारी दहा लोकप्रिय यूट्यूबर्सवर छापे टाकले. रिपोर्ट्सनुसार, आयकर विभागाकडे यूट्यूबर्सकडून गोळा केल्या जात असलेल्या कमाईबद्दल कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळेच आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी विभागाने सर्वेक्षण म्हणून हा छापा टाकला. असे सांगण्यात येत आहे की या छाप्यामागे यूट्यूबर्सना आयकर नियमांची माहिती देणे हा आहे जेणेकरून करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये. या छाप्यात सुमारे 25 कोटींची करचोरी झाल्याचे विभागाला समोर आले. असे काही YouTubers होते ज्यांना अजिबात कर मिळाला नाही. विभागाकडून अशा यूट्यूबर्सना नोटीस बजावण्यात आली आहे. आयकर विभागाने केरळमध्ये यूट्यूबर्सच्या घरांवर छापे टाकले आहेत. त्या...
कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड
पुणे

कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड

पुणे : कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता बधाले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिभा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेड पंचायत समिती सभापती अमर कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य कमल कड, माजी सरपंच व विद्यमान सदस्य शरद मुऱ्हे, माजी सरपंच देवराम सोनवणे, कविता गायकवाड, माजी उपसरपंच एम. के. सोनवणे, विजय कांबळे, अमोल सोनवणे, शोभा गायकवाड, नेहा बागडे, विशाल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिपक डोंगरे, गुलाब कांबळे, मनिषा मुऱ्हे, जैदाताई, माधुरी मालशिखर, तसेच माजी सदस्य स्वप्निल काबळे, जितेंद्र कांबळे (SRP खेड ता. अध्यक्ष) पो. पा...
संविधान लागू झाल्यापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच असताना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे – प्रा. बी. बी. शिंदे 
पिंपरी चिंचवड

संविधान लागू झाल्यापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच असताना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे – प्रा. बी. बी. शिंदे

चिंचवड, ता. २६ : आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असून, खरे बोलणे हा देशद्रोह ठरवला जात आहे. शिवाय हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. जेव्हापासून देशात संविधानाचा आमल सुरू झाला, तेव्हापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच तर आहेत. मग यांना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे. यांना हिंदुराष्ट्र या नावाने, ब्राह्मण राष्ट्र, मनुस्मृती, जातिभेदावर आधारित असणारे राष्ट्र निर्माण करून, भारतीय संविधान बाजूला करावयाचे आहे. हे बहुजनांनी पक्के लक्षात ठेवून, त्यांना खऱ्या अर्थाने सतेतून दूर करणे आवश्यक आहे. त्याकरिता या देशातील सर्व भारतीय नागरिकांनी सम विचारांनी आपले सर्व गट तट, विविध पक्ष, संघटना, विसर्जित करून, या देशातील बहुजन समाजाला न्याय मिळणे कामी, सर्वांनी या विषमतावादी शत्रूचा नायनाट करणेसाठी, सर्वांनी मिळून, एकत्रित लढा लढण्याची काळाची गरज आहे. हीच खरी या रयतेच्या राज...
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाहू महाराजांना अभिवादन
शैक्षणिक

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाहू महाराजांना अभिवादन

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या शिंनगारे, शाळेच्या मुख्याध्यापिका नाझमीन शेख व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी विश्वजीत काटे याने शाहू महाराज यांच्या जीवनावरती पोवाडा गायला, तसेच प्रियंका शहाबादे व प्रज्ञा शिरोडकर यांनी शाहू महाराजांविषयी माहिती सांगितली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरुण चाबुकस्वार म्हणाले; माणसांवर माणूस म्हणून प्रेम करणारे शाहू महाराज हे मोठ्या मनाचे राजे होते, सर्वसामान्य माणसाला राज्यात मान व विद्वान तस...
संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन
पिंपरी चिंचवड

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते : सतिश काळे पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील केएसबी चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव जाधव, शहर अध्यक्ष सतीश काळे, सचिव मंगेश चव्हाण, शहर कार्याध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मराठा सेवा संघाचे अशोक सातपुते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सतीश काळे म्हणाले की, " राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणुन साजरा केला जातो. समता, बंधुत्व तत्त्वांची शिकवण देणारे व आरक्षण धोरण प्रभावीपणे राबविणारे महान राजे म्हणुन शाहू महाराजांचे कार्य प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते आहेत...