न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाहू महाराजांना अभिवादन
पिंपरी (लोकमराठी न्यूज) : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या शिंनगारे, शाळेच्या मुख्याध्यापिका नाझमीन शेख व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इयत्ता पाचवीचा विद्यार्थी विश्वजीत काटे याने शाहू महाराज यांच्या जीवनावरती पोवाडा गायला, तसेच प्रियंका शहाबादे व प्रज्ञा शिरोडकर यांनी शाहू महाराजांविषयी माहिती सांगितली.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरुण चाबुकस्वार म्हणाले; माणसांवर माणूस म्हणून प्रेम करणारे शाहू महाराज हे मोठ्या मनाचे राजे होते, सर्वसामान्य माणसाला राज्यात मान व विद्वान तस...










