Tag: Marathi News

मराठा आरक्षणा संबंधी समन्वयकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करा 
पिंपरी चिंचवड, वायरल

मराठा आरक्षणा संबंधी समन्वयकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करा

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांची राज्यपालांकडे मागणी पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर मराठा आरक्षण शमविण्यासाठी मराठा मोर्चाच्या स्वयंघोषित समन्वयकांची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मराठा आरक्षण शमविण्यासाठी आंदोलनात फूट पाडण्याच्या हेतूने तात्कालिन सत्ताधारी नेत्यांनी पैशाची देवाण-घेवाण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामधील संबंधीत आत्ताचे मराठा आरक्षण उप-समितीचे अध्यक्ष व विद्यमान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पैशांचे आमिष दाखवून मराठा आरक्षणा संदर्भांत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या काही स्वयंघोषित समन्वयकांबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सदर ऑडिओ क्लिपच्या संभाषणावरुन स्पष्ट होत आहे.त्यामुळे व्हायरल झालेल्या ऑडिओ तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन

हडपसर, दि. १७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे अल्युमनी असोसिएशन, प्लेसमेंट सेल व मॅजिक बस इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे श्री. प्रवीण खिलारे, श्री.सागर ढेकळे व अवधूत राऊत उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनीसुद्धा भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न तरुणांच्या जीवावर पाहिले होते. आजच्या तरूणांनी स्कील बेस एज्युकेशन घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करावा. असे मत प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी व्यक्त केले. श्री.अवधूत राऊत यांनी विद्यार्थ्यांना...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज येथे प्लेसमेंट सेल आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने 'जॉब फेअर 2022-23 कंनेक्टींग टू फ्युचर' हा उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांच्या कल्पनेमधून सदर उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ॲकॅडमी मधील मा. अस्मिता राऊत उपस्थित होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी स्वतः मधील विविध स्किल डेव्हलप करायला पाहिजेत. तसेच इंग्रजी कम्युनिकेशन स्किल चांगले केल्यास त्यांना जगाच्या बाजारपेठेत मानाचे व सन्मानाचे स्थान प्राप्त होईल. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळेल. असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उ...
आंद्रा धरण नोव्हेंबरपासून पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणार; शंकर जगताप, महेश लांडगे, श्रीरंग बारणेंनी केली कामाची पाहणी
पिंपरी चिंचवड

आंद्रा धरण नोव्हेंबरपासून पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणार; शंकर जगताप, महेश लांडगे, श्रीरंग बारणेंनी केली कामाची पाहणी

पिंपरी, दि. १७ ऑक्टोबर २०२२ : पिंपरी-चिंचवडकरांना भेडसावणारी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातील पाणी आणले जाणार आहे. त्यातील आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणी नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच पिंपरी-चिंचवडकरांना उपलब्ध होणार आहे. या पाण्यावर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी आणण्यात येणाऱ्या पाण्यावर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाणार आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाची खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप व भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

हडपसर, 15 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. पद्ममणी कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक, वक्ते प्रा. डॉ. हनुमंत भवारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्याने कोणते तरी ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी वाचन, लेखन, मनन व चिंतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी थोर महापुरुषांची चरित्रे वाचणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल. वाचन हे माणसाला सक्षम बनवते व सत्याचा परिचय...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या वतीने 10 ऑक्टोंबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल जागृती व्हावी यासाठी PSY FUN कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. त्यामध्ये selfie Point, Psychological Movie, Posters, Lectures या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावरील पोस्टर तयार करून त्याचे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. महेंद्र शिंदे सरांनी केले. तसेच यावेळी Selfie Point चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना Psychological Movie दाखविन्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ...
खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्ती पत्र वाटप
राजकारण

खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्ती पत्र वाटप

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (दि. १० ऑक्टोबर) : राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अर्बन सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय जगताप, महिला अध्यक्ष मनीषा गटकळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये २५ महिला व २५ पुरुष असे ५० पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रत्येक समन्वयकांना पक्षाची जबाबदारी देताना प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्याची जाणीव करून खासदार वंदना यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व नवनियुक्त समन्वयकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनीही नवनियुक्त समन्वयकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी युवक अध्यक्ष इम्रान शेख, पक्षाचे प्रवक्ते फज...
महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांना नवजात बालकाचे(NICU) अतिदक्षता विभाग सुरू करा : आप
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांना नवजात बालकाचे(NICU) अतिदक्षता विभाग सुरू करा : आप

शहरातील पाच रुग्णालयामध्ये एनआयसीयु युनिट तातडीने सुरू करणार - सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण पांडुंरंग गोफणे यांचे आश्वासन पिंपरी चिंचवड : मनपाच्या विविध रुग्णालयात लोकसंख्येच्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. मनपाच्या (PCMC) रुग्णालयात बाळंतपण विनामूल्य असल्याने अनेक गरजू,गरीब व श्रमिक रुग्णालयाकडे नागरिकांचा लोंढा जास्त आहे. त्यामुळे येथील मुख्य रुग्णालयात प्रसूतिगृहमध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करावे,अशी मागणी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांचे कडे केली आहे.आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाण मनपाच्या प्रवेश द्वारासमोर निदर्शने करण्यात आली. चेतन बेंद्रे बोलताना म्हणाले की (Chetan Bendre), नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच प्रसुतीपश्चात बाळाला योग्य सुविधा ...
संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी 
पिंपरी चिंचवड, सामाजिक

संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी

पिंपरी : विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समस्त बहुजन समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. काळेवाडीतील युवानेते बाबासाहेब जगताप यांच्या सहकार्याने संत शिरोमणी श्री सावता महाराज प्रतिष्ठान यांना बांधकामसाठी लागणारे मटेरियल आणि रोख रक्कम सहीत रु ५१००० हजार रूपयांची देणगी समस्त बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आली. ही देणगी समाजप्रबोधनकार शारदा मुंढे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुखदेव खेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी प्रहार पक्षाचे नेते संजय गायके, सामाजिक नेत्या रेखा काटे, रहाटणी गावचे सामाजिक नेते तात्या शिंगारे, दिलीप पवार, मनोज जाधव, विलास पवार, सिताराम जगताप, पंकज पवार, अरुण मैराळे, अनिल मखरे, निलेश भोसले, रंगनाथ भुजबळ, कोंडीबा कुटे, बापु काटे, सचिन पार्टे आदी उपस्थित होते. बाबासाहेब जगताप...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी विलास मडिगेरी व योगेश लांडगे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शिवप्रेमींचे आंदोलन
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी विलास मडिगेरी व योगेश लांडगे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शिवप्रेमींचे आंदोलन

पिंपरी : इंद्रायणीनगर व मोशी प्राधिकरण व भोसरी परिसरात भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विलास मडिगेरी व योगेश लांडगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचलन कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले असून त्यामध्ये जाणीवपूर्वक संघाचे हेगडेवार यांचा एक नंबर ला फोटो लाऊन त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो दोन नंबरला लाऊन त्यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याने याचा निषेध करणेकामी इंद्रायणीनगर मधील तिरुपती चौकात शिवप्रेमी व समविचारी पक्ष संघटना यांच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विलास मडिगेरी व योगेश लांडगे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करून समाज भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. वास्तविक पाहता शिवरायांची हिमालयापेक्षा उत्तुंग उंची असताना या फ्लेक्समध्ये ज्यांची योग्यता नाही अशा सोबत लावलेल्या फोटो...