‘आरटीई’ च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव ; एन एस यु आय आक्रमक
पिंपरी (लोकमराठी न्यूज) : गरीब कुटुंबातील मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण मिळावे या शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) मूळ उद्देशाला धाब्यावर बसवण्याचा प्रकार चिंचवड येथील शाळेत घडला आहे. चिंचवड येथील एका नामांकित अशा इंटरनॅशनल स्कूल या शाळेत 'आरटीई' मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग करून त्यांना शाळेच्या मुख्य इमारातीपासून दूर वेगळ्या ठिकाणी त्यांना शिकवले जात असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली असून शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नायकवडी यांच्याकडे ही तक्रार केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील या शाळेत उच्चभ्रू वर्गातील मुले शिकतात 'आरटीई' च्या नियमानुसार शाळेला 25% प्रवेश गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे, शाळेने ही प्रक्रिया पूर्ण केली; पण शाळा सुरू झाल्...










