KALEWADI : काळेवाडीत नवरात्री नवरंग स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात
मा. नगरसेविका निता पाडाळे यांच्यातर्फे केले होते कार्यक्रमाचे आयोजन
काळेवाडी : संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्री नवरंग स्पर्धा २०२२ व गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२ मधील विजेत्यांचा बक्षिस समारंभ उत्साहात पार पडला. त्यानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या खेळरंगला पैठणीचा या कार्यक्रमाचा महिलांनी आनंदाचा लुटला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य शंकरशेठ जगताप, स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा मोनिका सिक्का, माजी नगरसेविका निर्मला कुटे, आरती चौधे, सविता खुळे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा सायली नढे, स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळुराम नढे, दिलीप आंब्रे, प्रकाश लोहार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, दशरथ वीर, पांडुरंग पाडाळे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, अॅड हर्षद नढे, गितेश दळवी, सु...