Tag: Marathi News

प्रबुद्ध संघातर्फे चिंचवडगाव येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा 
सामाजिक

प्रबुद्ध संघातर्फे चिंचवडगाव येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

चिंचवडगाव : प्रबुद्ध संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त मेजर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मेजर शिंदे यांनी युद्धामधील काही प्रसंग सांगितले. " देश एक संघ राहण्यासाठी आपल्याकडे संविधान लाख मोलाचं आहे, ख-या अर्थाने लोकशाही ही जगात जर श्रेष्ठ असेल तर संविधानामुळेच आहे. असे मेजर शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. या वेळी प्रदिप पवार, पारबत गुरूजी, डॉ. धर्मेंद्र रामटेके यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुरेश भोईर, मधुकर बच्चे यांच्यासह बहूसंख्य नागरिक व प्रबुद्ध संघाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रबुद्ध संघाचे सचिव किशन बलखंडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिंगबर घोडके, राजू वासनिक, दिलीप गोडबोले यांनी सहकार्य केले. ...
एस. एम. जोशी कॉलेजमधील 2 MAH BN NCC विभागातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथील रिपब्लिक डे 23 परेडसाठी निवड
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील 2 MAH BN NCC विभागातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथील रिपब्लिक डे 23 परेडसाठी निवड

हडपसर (प्रतिनिधी) : भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुरमु यांच्या उपस्थितीत 74 वा प्रजासत्ताक दिन राजपत दिल्ली येथे संपन्न होणार आहे. 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेड मध्ये एस. एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेनेमधील तीन कॅडेट्स सहभागी होणार आहेत. यावर्षीचा विशेष बहुमान प्राप्त झालेले एस. एम. जोशी कॉलेजमधील सुरज बाळासाहेब घरत, निखिल अशोक घटी, गिरीश नंदविजय लाड हे तीन कॅडेट्स आहेत. एकूण 250 कॅडेट्स मधून 2- महाराष्ट्र बटालियन व एनसीसी विभाग एस. एम. जोशी कॉलेज हडपसर यांच्या तीन कॅडेट्सची निवड राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी झाली आहे. या सर्व कॅडेट्सचे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे, जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (...
कवीची ओळख ही त्याच्या वैचारिक भूमिकेतून व्हायला हवी – कवी संतोष पवार
पुणे

कवीची ओळख ही त्याच्या वैचारिक भूमिकेतून व्हायला हवी – कवी संतोष पवार

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्यसंमेलन व पत्रकार गौरव समारंभ संपन्न हडपसर (प्रतिनिधी) : समाजाला डोळसपणे पाहून जर काव्य लिहिले तर ते समाजमनाला आवडते. कवीची ओळख ही त्याच्या वैचारिक भूमिकेतून व्हायला हवी. आम्ही चळवळीच्या प्रदेशातील कवी आहोत. त्यामुळेच आमच्या कवितेत वैचारिकता दिसून येते. जिथे श्वास थांबतो तिथे कवितेची ओळ थांबते. जिथे विचार संपतो तिथे कविता संपते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी संतोष पवार (Santosh Pawar) यांनी येथे केले. एस. एम. जोशी कॉलेजमध्ये (SM Joshi College) मराठी विभाग व मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, वैश्विक कला पर्यावरण यांच्या वतीने मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्य संमेलन व पत्रकार गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या गांधीला टाळून, माहेराला माती होती, माती जन्माची सोबती, बाईपणाच्या जातीला घोर लागल...
एस. एम. जोशी कॉलेजच्या साक्षी काकडे यांना रोइंग स्पर्धेत ब्राँझ मेडल 
क्रीडा

एस. एम. जोशी कॉलेजच्या साक्षी काकडे यांना रोइंग स्पर्धेत ब्राँझ मेडल

हडपसर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन आयोजित महाराष्ट्र स्टेट मिनी ऑलिम्पिक स्पर्धा 2023 रोइंग मुलींच्या स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील खेळाडू साक्षी काकडे यांना ब्राँझ मेडल मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना प्रा. वासावे डी.एल. शारीरिक शिक्षण संचालक यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले....
पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशनच्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशनच्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपळे सौदागर : मोफत महाआरोग्य शिबिरात सहभागी झालेले नागरिक. त्यावेळी उपस्थित कुंदा भिसे व संजय भिसे. पिंपळे सौदागर : उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ब्रहमचैतन्य आयुर्वेद क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत महाआरोग्य आयुर्वेदीक तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवारी येथे करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात बधिरपणा, हाता पायाला मुंग्या येणे, संधीवात, पोटाचे आजार, मणक्यांचे आजार, दमा, अस्थमा, मुळव्याध, त्वचाविकार, स्त्रियांचे आजार, अम्लपित्त, डोके दुखी, अर्धशिशी (माईग्रेन), सर्दी व खोकला, वारंवार शिंका येणे आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले. त्याप्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उद्योजक संजय भिसे, डॉ. सुभाषचंद्र पवार, विलास जोशी, अनिल कुलकर्णी, सतिश पिंगळे, विवेकानंद लीगाडे, सुरेश कुंजीर, सागर बिरारी, सुभाष पाटील...
डॉ. दिनकर मुरकुटे यांची इतिहास अभ्यास मंडळावर निवड 
पुणे

डॉ. दिनकर मुरकुटे यांची इतिहास अभ्यास मंडळावर निवड

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेजमधील इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर रावजी मुरकुटे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी झाले. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दस्ताऐवजाच्या प्रकल्पाचे ते संपादक आहेत. एम. जे. कॉलेज जळगाव इतिहास अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांनी विविध विषयांवरील शोध निबंध, संदर्भ ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे. या अभ्यास मंडळाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय गायकवाड, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, कला विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले....
सडलेला मेंदू आणि विकृत मानसिकता असलेल्या प्रवृत्तीला ठेचून काढा – कविता अल्हाट
पिंपरी चिंचवड

सडलेला मेंदू आणि विकृत मानसिकता असलेल्या प्रवृत्तीला ठेचून काढा – कविता अल्हाट

भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीची तीव्र निदर्शने बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : महाराष्ट्र ही संतांची भूमी असण्यासोबतच सुसंस्कृत असे पुरोगामी राज्य आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जाणिवपूर्वक सातत्याने राज्यातील महापुरूषांचा अपमान केला जात आहे. आता तर विरोधी पक्षातील नेत्यांचाही अपमान भाजपचे आमदार करत आहेत. महागाई, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्‍नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच आक्षेपार्ह आणि वाद्‌ग्रस्त विधाने करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आहे. आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला. शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह असे विधान केले होते. याच्...
पिंपळे सौदागरमध्ये स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपळे सौदागर : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप (MLA Laxman Jagtap) यांना पिंपळे सौदागर येथे दुख:मय वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयात बुधवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) अध्यक्षा कुंदा भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष रमेश वाणी, आनंद हास्य क्लब राजेंद्रनाथ जयस्वाल, अल्कोवे सोसायटीचे अध्यक्ष विजय भांगरे, शरद दाऊतखानी, कल्पना बागुल, तात्या शिनगारे, उत्तर महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाचे संपर्क प्रमुख मनोज ब्राम्हणकर, श्रीकृष्ण निलेगावकर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्याप्रसंगी लक्ष्मणभाऊ यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करताना अनेकांना भावना अनावर झाल्या. लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली ...
महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचारा विरोधात आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम 
पिंपरी चिंचवड

महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचारा विरोधात आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : महाराष्ट्र संपूर्ण देशात वाढलेली महागाई, तरुणांच्या हाताला नसणारे रोजगार, त्याच बरोबर केंद्र, राज्य आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचा वाढलेला भ्रष्ट्राचार, भाजपा नेत्यांकडून थोर पुरुषांविषयी वारंवार केली जाणारी अपमान जनक वक्तव्य, आधीच बेरोजगारी वाढली असताना महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग-धंदे, शहरात वाढलेली गुन्हेगारी या ज्वलंत विषयांवर जनतेत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जन जागर यात्रेचे आज (दि. ५ जानेवारी) पिंपरी चिंचवड शहरात आगमन होत आहे. यानिमित्ताने जन जागर कोपरा सभेचे आयोजन केलेले आहे. या जन जागर यात्रे निमीत्ताने डिलक्स चौक, पिंपरी येथे दुपारी ०३:०० वाजता, खंडोबा माळ, आकुर्डी येथे सायंकाळी ०४:३० वाजता, गोसावी हॉस्पीटल, रूपीनगर&nbs...
घटस्फोट का होतात ? ही आहेत काही प्रमुख कारणे
सिटिझन जर्नालिस्ट

घटस्फोट का होतात ? ही आहेत काही प्रमुख कारणे

ज्योत्स्ना राणे घटस्फोट होण्यास खुप कारणे असु शकतात. बघायला गेले तर भारत हा अशा देशांपैकी एक असा देश आहे. जिथे घटस्फोटांचे प्रमाण खुप कमी आहे. पण बदलत्या काळानुसार हे चित्र बदलायला लागल आहे. गेल्या काही वर्षात घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसुन आलेली आहे. मुलीचे लग्न करताना मुलाचे कर्तृत्व पाहुन नाही तर मुलाच्या वडिलांची संपत्ती पाहुन लग्न केले जाते. जर तो मुलगा व्यसनी निगाला, तर त्या मुलीला कधीच असे वाटत नाही की, आपल्या बापाने आपल्याला डोलीत पाठवीले की आयुष्यभरासाठी तिळडीवर झोपविले. कोणते कारण असू शकतात घटस्फोट होण्यास? प्रामाणिक नसणे - विश्वास आणि प्रामाणिकता हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. जर नात्यात विश्वासच नसला तर कुठलेही नाते टिकू शकत नाही. कम्युनिकेशन्स गॅप - संवाद साधने खुप गरजेचे असते. कधीकधी संवाद नसल्याने नात्यात दुरावा ...