घटस्फोट का होतात ? ही आहेत काही प्रमुख कारणे
ज्योत्स्ना राणे
घटस्फोट होण्यास खुप कारणे असु शकतात. बघायला गेले तर भारत हा अशा देशांपैकी एक असा देश आहे. जिथे घटस्फोटांचे प्रमाण खुप कमी आहे. पण बदलत्या काळानुसार हे चित्र बदलायला लागल आहे. गेल्या काही वर्षात घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसुन आलेली आहे.
मुलीचे लग्न करताना मुलाचे कर्तृत्व पाहुन नाही तर मुलाच्या वडिलांची संपत्ती पाहुन लग्न केले जाते. जर तो मुलगा व्यसनी निगाला, तर त्या मुलीला कधीच असे वाटत नाही की, आपल्या बापाने आपल्याला डोलीत पाठवीले की आयुष्यभरासाठी तिळडीवर झोपविले.
कोणते कारण असू शकतात घटस्फोट होण्यास?
प्रामाणिक नसणे - विश्वास आणि प्रामाणिकता हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. जर नात्यात विश्वासच नसला तर कुठलेही नाते टिकू शकत नाही.
कम्युनिकेशन्स गॅप - संवाद साधने खुप गरजेचे असते. कधीकधी संवाद नसल्याने नात्यात दुरावा ...










