पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर : मानवतावादाचा दीपस्तंभ
प्रा. डॉ. संदीप वाकडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचा जन्म 31 मे इ.स. 1725 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामध्ये जामखेड (Jamkhed) तालुक्यातील 'चौंडी' या गावी झाला. पुढे होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांनी हुशार व 'त' म्हणता ताक ओळखणा-या चौंडीच्या मानकोजी पाटलांची (Mankoji Patil) लेक अहिल्यादेवी यांना आपली सून म्हणून होळकर घराण्यात आणले. पुढे मुळच्याच हुशार असलेल्या अहिल्यादेवी सासरे मल्हारराव (Malharrao) यांच्या पाठीमागे हळूहळू कारभार पाहू लागल्या. त्यांच्या या कर्तृत्वामुळे मल्हाररावही त्यांच्यावर हळूहळू एक-एक जबाबदारी टाकू लागले. असे सर्व सुरळीत चालले असता, कुंभेरीच्या (Kunbheri) वेढ्यात पती खंडेराव जेव्हा धारातीर्थी पडतात, तेव्हा अहिल्यादेवी यांना जबर धक्का बसतो. त्या पूर्णतः खचून जातात. होळकर घराण्यात आल्यापासून त्यांनी कितीतरी...