आमदार रोहित पवार यांची भरिव विकास कामे पाहून विरोधकांना पोटदुखी
लोकमराठी न्यूज नेटवर्क
कर्जत (प्रतिनिधी) : आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात सुरू केलेली भरिव विकास कामे पाहूनच विरोधकांना पोटदुखी झाली आहे. नगरपंचायत निवडणूकीत आपल्या भवितव्यास धोका निर्माण झाल्याने आ. रोहित पवार यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. असा पलटवार नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी केला आहे.
मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. अशी टिका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी केली होती. या टीकेला आमदार पवार यांच्यावतीने उत्तर देण्यासाठी नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी पुढाकार घेऊन दादासाहेब सोनमाळी यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
देताना मनीषा सोनमाळी म्हणाल्या की, कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघात सध्या 'आमदार...










