दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
मनीषा वाल्मिकी अत्याचार प्रकरणी योगी आदित्यनाथ राजीनामा द्या - सिद्दीकभाई शेख
पिंपरी चिंचवड : उत्तर प्रदेश मधील हाथरस याठिकाणी मनीषा वाल्मिकी नावाच्या १९ वर्षीय तरूणीवर मारहाण करून १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक २९ सप्टेंबर रोजी रोजी तिचा मृत्यू झालेला आहे.मृत्यूनंतर तिचा अंतिम संस्कार तिच्या परिवाराच्या परवानगीशिवाय घाईगडबडीत रात्रीच्या वेळी करण्यात आला. हि घटना ताजी असतानाच लैंगिक अत्याचाराच्या ३ घटना घडल्या .यामुळे उत्तरप्रदेश मधील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने दि. २ ऑकटोबर २०२० रोजी ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डांगेचौक थेरगाव या ठिकाणी सकाळी " निदर्शने आंदोलन " करण्यात आले.
यावेळी बोलताना अपना वतन...