Tag: MLA Rohit Pawar

होय, आहे आपली दहशत – आमदार रोहित पवार
महाराष्ट्र, राजकारण

होय, आहे आपली दहशत – आमदार रोहित पवार

प्रतिनिधी|कर्जत : होय, आहे आपली दहशत पण ती विकासाच्या राजकारणाची, महिला, माता- भगिनींच्या संरक्षणाची. विकासाच्या राजकारणावर बोलायचे असेल तर आपली केव्हाही तयारी आहे. आरोप - प्रत्यारोप करताना भविष्यात तुम्ही आणखी पातळी खाली घालवली तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवतील. त्यामुळे नैतिकता राखून बोला अन्यथा पुढील दहा वर्षात जनता काय करू शकते ते पहा. आपण विधानसभेत जे शब्द दिले तो पाळण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यासाठी थोडा अवधी लागणार आहे. मात्र तरी आपण काही ठिकाणी तो शब्द पाळला नाहीतर माझे कान पकडण्याचा अधिकार देखील जनतेला आहे असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले. दि.७ रोजी ते कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी अर्ज दाखल सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, राजेंद्र गुंड, नितीन धांडे, नानासाहेब निकत, बारामती...
दोन वर्षात काय विकासकामे केली ते समोरासमोर एकदा सांगाच | राम शिंदेचे आ रोहित पवार यांना खुले आव्हान
महाराष्ट्र

दोन वर्षात काय विकासकामे केली ते समोरासमोर एकदा सांगाच | राम शिंदेचे आ रोहित पवार यांना खुले आव्हान

सोमवारी भाजपाचे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल कर्जत (प्रतिनिधी) : दोन वर्षात काय विकासाचे काम केले आहे ते एकदा आमने सामने झालेच पाहिजे असे म्हणत राम शिंदे यांनी आ रोहित पवार यांना खुले आव्हान दिले. ते कर्जत येथे भाजपाच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी बोलत होते. यावेळी खा.डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, जामखेडचे अजय काशीद, रवी सुरवसे आदी उपस्थित होते. सोमवारी दुपारी भाजपाने मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी पुढे बोलताना माजीमंत्री राम शिंदे म्हणाले की, आपण विधानसभेत सांगितल्याप्रमाणे कर्जत शहराचे सर्व प्रलंबित प्रश्न प्रामाणिकपणे सोडविले. मंत्रीपदाचा पदभार घेतल्यावर सर्वप्रथम कर्जतचा पाणी प्रश्न तात्काळ सोडविला. यासह ...
अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड

कर्जत : अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दि.२६ रोजी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या बोर्ड मिटींगमध्ये ही निवड करण्यात आली. या निवडीनंतर साळुंके यांच्या समर्थकांनी कर्जत व तालुक्यातील गावांमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत साळुंके कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांना केवळ एका मताने पराभव झाला होता. मात्र हा पराभव केवळ तालुक्याच्याच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जिव्हारी लागला होता. कारण मतदानाच्या अगोदर झालेल्या नाट्यमय खेळीची आणि त्यातच जवळ राहून कुरघोड्या केलेल्या तालुक्यातील अनेक नेत्यांच्या छुप्या डावाची चर्चाही लपून राह...
आमदार रोहित पवार यांची भरिव विकास कामे पाहून विरोधकांना पोटदुखी
महाराष्ट्र, राजकारण

आमदार रोहित पवार यांची भरिव विकास कामे पाहून विरोधकांना पोटदुखी

लोकमराठी न्यूज नेटवर्क कर्जत (प्रतिनिधी) : आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात सुरू केलेली भरिव विकास कामे पाहूनच विरोधकांना पोटदुखी झाली आहे. नगरपंचायत निवडणूकीत आपल्या भवितव्यास धोका निर्माण झाल्याने आ. रोहित पवार यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. असा पलटवार नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. अशी टिका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी केली होती. या टीकेला आमदार पवार यांच्यावतीने उत्तर देण्यासाठी नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी पुढाकार घेऊन दादासाहेब सोनमाळी यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. देताना मनीषा सोनमाळी म्हणाल्या की, कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघात सध्या 'आमदार...
आमदार रोहित पवार यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू
महाराष्ट्र

आमदार रोहित पवार यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू

लोकमराठी न्यूज नेटवर्क कर्जत (प्रतिनिधी) : आमदार पवार यांची कार्यपद्धती पाहता जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. अशी टिका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी केली. राम शिंदेंच्या काळात भाजपात एकाकी पडलेला विखे गट आता राम शिंदें बरोबर भाजपात जोमाने सक्रिय झाला. आणि आता आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर टिका करू लागला आहे. यात भाजपातील विखे गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी दिवाळीपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे टिका केली आहे. सध्यातरी मतदारसंघात लहरी राजा - प्रजा आंधळी आणि अंधातरी दरबार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी टीका भाजपाचे दादा सोनमाळी यांनी आमदार पवार यांच्...
देशाच बजेट आहे की भाजपचं इलेक्शन पॅकेज | आमदार रोहित पवार यांची मोदी सरकारवर टिका
महाराष्ट्र, मोठी बातमी

देशाच बजेट आहे की भाजपचं इलेक्शन पॅकेज | आमदार रोहित पवार यांची मोदी सरकारवर टिका

मुंबई : निवडणुका असलेल्या राज्यांसाठी योजनांची केलेली खैरात पाहिली तर हे देशाचं बजेट आहे की भाजपचं 'इलेक्शन पॅकेज' आहे,अशी शंका येते. नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठीची तरतूद वगळता देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला बजेटमध्ये अक्षरशः पाने पुसण्यात आली. अशी जोरदार टिका कर्जत जामखेड (karjat-jamkhed) मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आमदार पवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर लिहिले आहे की, निर्गुंतवणुकीकरणावर दिलेला भर हे काही चांगलं लक्षण नाही. सोप्या शब्दांत सांगायचं तर वडिलोपार्जित संपत्ती विकून बाजारहाट करण्यासारखं आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मागणी वाढवण्याकडं आणि सीमेवर तणाव असतानाही लष्करासाठी भरीव तरतूद करण्याकडं सपशेल दुर्लक्ष करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं पण ते कल्याण कसं करणार याची कोणतीही...