Tag: NCP

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी (बाळासाहेब मुळे) : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी याठिकाणी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते संपन्न झाला. कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वैशाली काळभोर, दत्तात्रय जगताप, विजय लोखंडे, संगीता कोकणे, वर्षा जगताप आवटी, गोरक्ष लोखंडे, सुगंधा पाषाणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते....
भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय मोठ्या संकटात – शरद पवार
राष्ट्रीय, मोठी बातमी

भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय मोठ्या संकटात – शरद पवार

शरद पवारांचे पंतप्रधानांना कृषी क्षेत्रातील संकटाबाबत पत्र मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी शेतीशी निगडीत कामे करण्यास सक्षम नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे आपण त्वरित शेतीविषयक ठोस धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी क्षेत्रावरील संकट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान आपण पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हितासंबंधी निर्णय घेण्यास पुढाकार घेवून आवश्यक ती पावले उचलावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सी...
महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे यांची निवड
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे यांची निवड

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. त्या सांगवीचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना 81 मते पडली. तर, राष्ट्रवादीच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा पराभव झाला. त्यांना 41 मते पडली. ढोरे 40 मतांनी विजयी झाल्या. उपमहापौरपदी भाजपचे तुषार हिंगे बिनविरोध निवडून आले. दरम्यान, अपक्षांनी भाजपला मतदान केले. शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केले. तर, निलेश बारणे, प्रमोद कुटे गैरहजर राहिले. मनसेचे सचिन चिखले आणि अपक्ष नवनाथ जगताप देखील गैरहजर राहिले. महापौर आणि उपमहापौरपदाच्या रिक्त जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे या पक्षाच्या माई ढोरे यांची महापौरपदी आणि तुषार हिंगे यांची उपमहापौरपदी निवड होणार असल्याचे उमेदवारी अर्ज दाखल...
नदीपात्रातील कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू – विशाल वाकडकर
पिंपरी चिंचवड

नदीपात्रातील कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू – विशाल वाकडकर

पिंपरी-चिंचवड, (लोकमराठी) : देहुरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावर रावेत उड्डाणपूलाखाली नदिपात्रात मागील अनेक दिवसांपासून कचरा टाकण्यात येत आहे. तो कचरा पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने ताबडतोब उचलावा व कचरा टाकणा-या संबधित ठेकेदारांवर किंवा जबाबदार असणा-या व्यक्तींवर प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पुढील दोन दिवसात तो कचरा आयुक्तांच्या कार्यालयात आणून टाकू असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. रावेत जलउपसा केंद्राच्या वरच्या टप्प्यात हा कचरा टाकण्यात येत आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त अस्वच्छ पाणी नदीतील पाण्यात मिसळत आहे. तेच दुषित पाणी रावेत जलउपसा केंद्रातून शहरातील 25 लाखांहून जास्त लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी उचलले जाते. या पाण्यात कच-यातील हानीकारक जीवजंतू आणि त्य...
मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक
मोठी बातमी

मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक

रायगड : कामोठे येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुध्द सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. हीी कारवाई शनिवारी (दि. २७) सायंकाळी करण्यात आली. संदीप रामकृष्ण पराडकर (वय 31, रा. रूद्रराज बिल्डींग, कामोठे) आणि वैभव विठोबा पाटील (वय 34, रा. कामोठे गाव, ता. पनवेल, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११ हजार ९०० रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो व नावे असलेली यादी सापडली. चरणदीपसिंग बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल...
थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा
पिंपरी चिंचवड, राजकारण

थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना थेरगाव मधील बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आहे. पार्थ पवार हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी पार्थ पवार हे थेरगाव येथे प्रचारासाठी गेले असताना त्यांना बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. थेरगाव मधील निलेश बारणे, प्रशांत बारणे, काळूराम बारणे, संभाजी बारणे, जयसिंग बारणे, शंकर बारणे यांच्यासह संपूर्ण थेरगाव मधील बारणे परिवाराने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावेळी बोलताना संभाजी बारणे म्हणाले की, मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी कोणत्याही प्रकारची कामे या भागात केली नाही. खासदार म्हणून कोणताही निधी थेरगाव भागाला देण्यात आला नाही. थेरगाव मध्ये अनेक प्रश्न आहेत मात्र कोणतेच प्रश्न सोडविण्यासाठी त्या...