पिंपरी चिंचवडमधील लाॅकडाऊनच्या अफवेवर विश्वास ठेवू नये – आयुक्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तथापि सोशल मिडीयामध्ये प्रसारीत होत असलेल्या याबाबतच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याने यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे....