Tag: pcmc pimpri chinchwad pune

covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील

पिंपरी (लोकमराठी) : कोरोना विषाणूने जगभरात थैमान धालते असून देश, राज्याबरोबर शहरातही कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी रविवारी (दि. 19 एप्रिल) मध्यरात्री बारापासून 27 एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरच सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहराच्या सर्व सीमा आणि प्रमुख रस्ते बंद करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागरिकांच्या हालचाली व बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्यासाठी संपूर्ण शहर सील केले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून ( दि. 20) नागरिकांना काही सवलती देण्यात येणार होत्या. मात्र, त्या दिल्यास कोरोनाचा आणखी प्रसार होऊ शकतो. त्यात शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असून पुणे शहरासह चाकण, हिंजवडी औद्योगिक क्षेत्र लागून आहे. त्यामुळे नोकरी आणि कामानिमित...
Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा
पिंपरी चिंचवड

Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा

पिंपरी (लोकमराठी) : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे अनेक नागरिक आहे त्या ठिकाणीच अडकलेले आहेत. मात्र आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या काळात वैद्यकीय अथवा मृत्यू किंवा अन्य अत्यावश्यक आपत्कालीन कारणास्तव पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतू राज्यातील अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास ची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे ज्यांना खरच गरज आहे अशा व्यक्तींना आता इच्छित ठिकाणी जाता येणार आहे. मात्र, हा ई-पास केवळ अत्यावश्यक सेवेसाठी असणार आहे असं नमूद करण्यात आलं आहे. https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन आवश्यक असलेली कागदपत्र आणि फोटो अपलोड करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून यामुळे शहरातील एकाचा मृत्यू देखील झाला आहे...
Covid-19 : करोना बाधित अंडी विक्रेत्यामुळे १८० जणांचं विलगीकरण
पिंपरी चिंचवड

Covid-19 : करोना बाधित अंडी विक्रेत्यामुळे १८० जणांचं विलगीकरण

पिंपरी (लोकमराठी) : भोसरीत राहणाऱ्या व इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या परिसरातील १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. भोसरी येथील राहणारा हा विक्रेता महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहे. तो किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांचा पुरवठा करायचा. पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, भोसरी परिसरातील एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले असून तो इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करत होता. यामुळे वेगवेगळ्या भागातील ऐकून १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. कनकवले यांनी दिली आहे. यात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांचा समावेश आहे. परिसरातील नानेकरवाडी, खराबवाडी आणि मेंदनक...
Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय माहिती
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय माहिती

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्या नकाशावर बुधवारपर्यतची रूग्णांची आकडेवारी दिली आहे. ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये अ प्रभाग (रूग्ण संख्या - ०१) प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर). ब प्रभाग (रूग्ण संख्या - ०) प्रभागातील परिसर प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२(काळेवाडी). क प्रभाग (रूग्ण संख्या - ०८) प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा). ड प्रभाग (रूग्ण संख्या - ०) प्रभाग...
Lockdown: सांगवीत पोलिसांचा रुट मार्च; नागरिकांनी टाळ्या वाजवून केले स्वागत
पिंपरी चिंचवड

Lockdown: सांगवीत पोलिसांचा रुट मार्च; नागरिकांनी टाळ्या वाजवून केले स्वागत

पिंपरी (लोकमराठी) : सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लोकांनी घराबाहेर पडू नये हा संदेश देण्यासाठी रूट मार्च काढला. यावेळी ज्या भागातून हा रुट मार्च गेला तिथल्या लोकांनी घरातून पोलिसांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिलं. दरम्यान, करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये पुन्हा ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, करोनाच्या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी चोख भूमिका बजावत आहेत. रस्त्यावर उतरून पोलीस आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. करोना विषाणूचा फैलाव सुरुच असून भारतात अनेकांचा आपला जीव गमवाव लागला आहे. वारंवार नागरिकांना आवाहन करूनही ते घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करीत अनेकांना काठीचा प्रसादही दिला होता. या कारवाईमुळं लोकांचं घराबाहेर पडणं काहीसं कमी झालं. ज्या भागात पोलिसांनी घराबाहेर पडणाऱ्यांना काठ्यांचा प्रस...
वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी नागरिकांना मोफत मास्क वाटप | नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा पुढाकार
पिंपरी चिंचवड

वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी नागरिकांना मोफत मास्क वाटप | नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा पुढाकार

लोकमराठी न्यूज नेटवर्क रहाटणी : नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून जगभरात पसरलेल्या व भारतात दाखल झालेल्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मास्क वाटपाचा उपक्रम राबवला. चीनमधून जगातील विविध देशात पसरलेल्या कोरोना वायरसमुळे हजारो नागरिकांचे बळी गेले असून भारतात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर नुकतेच करोनाचे रूग्ण पुणे व पिंपरी चिंचवड शहरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, योग्य काळजी व उपाययोजना केल्यास करोनापासून संरक्षण करणे सहज शक्य आहे. असे सरकार व डॉक्टरांडून सांगितले जात आहे. सामाजिक बाधिलकी व मास्कचा तुटवडा लक्षात घेता नागरिकांचे कोरोनापासून सरंक्षण व्हावे, यासाठी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रहाटणीतील शाळेत मुला-मुलींना, सोसायटी सदस्य व ज्येष्ठ नागरिकांना मोफत मास्क वाटप केले. https://twitt...
महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची पालकमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची पालकमंत्र्यांकडे मागणी

Lok Marathi News Network पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेत पारदर्शक सत्तेची हमी देऊन विराजमान झालेल्या भाजप सरकारच्या सत्ताकाळात सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत महानगरपालिकच्या भ्रष्ट पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार सल्लागारांच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच भ्रष्टाचार प्रकरणाची फाईल त्यांनी पालकमंत्र्यांकडे दिली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “ना खाऊंगा, ना खाने दुंगा” ही घोषणा करून भ्रष्टाचार मुक्त भारत करू ही हमी जनतेला दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र ही घोषणा करीत पारदर्शक कारभाराची हमी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०...
बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील महापालिकेच्या 28 लिपिकांची खातेनिहाय चाैकशी
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील महापालिकेच्या 28 लिपिकांची खातेनिहाय चाैकशी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे 117 कर्मचा-यांपैकी 28 लिपिकांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्या कर्मचा-यांचे वर्ग ड चतुर्थश्रेणी पदावर पदावतन करुन खातेनिहाय चाैकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. त...