Tag: pcmc

सरकारने तृतीयपंथीयांवर अन्याय केल्यास, सरकार विरोधात सुप्रिम कोर्टापर्यंत न्याय मागणार
पिंपरी चिंचवड

सरकारने तृतीयपंथीयांवर अन्याय केल्यास, सरकार विरोधात सुप्रिम कोर्टापर्यंत न्याय मागणार

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. ४ डिसेंबर २०२२ : राज्यभरात अनेक तृतीयपंथीयांना पोलिस भरती प्रक्रियेत सामील व्हायचे आहे, पण राज्य सरकारने पोलिस भरतीत आवश्यक कोणतेही बदल न केल्याने त्याना अर्ज दाखल करता आलेला नाही. तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसकडून तृतीयपंथीयांचा स्वतंत्र सेल स्थापन करत संघटन केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅग्रेसने क्रांतीकारक पाऊल उचल तृतीयपंथी समाजातील घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतू, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना सामावून घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. तृतीयपंथीयांना पोलिस भरती प्रक्रियेत सामावून न घेतल्यास राष्ट्रवादी काॅग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल. समाजाच्या मुख्य प्रवाहात...
डॉ. तारिक शेख यांचे तापकीर चौकात क्लिनिक सुरू
पिंपरी चिंचवड, आरोग्य

डॉ. तारिक शेख यांचे तापकीर चौकात क्लिनिक सुरू

उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते झाले उद्घाटन काळेवाडी : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ. तारिक शेख (Dr Tariq Shaikh) व डॉ. आस्मा शेख (Dr Asma Shaikh) यांचा काळेवाडी येथील तापकीर चौकात 'राहत क्लिनिक' या नावाने दवाखाना सुरू झाला आहे. या क्लिनिकचे उद्घाटन उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, दंत चिकित्सक डॉ. राजू कुंभार, ओझनटेक सोलूशनचे संचालक प्रसाद गुप्ते, मोहम्मद सलीम बेलीफ, प्रशांत भोसले, संतोष जाधव, डॉ. तारिक शेख, डॉ. आस्मा तारिक शेख, पत्रकार रविंद्र जगधने, कालीदास जगधने, अजय वायदंडे आदी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील खेडोपाड्यात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन डॉ. शेख यांनी सेवा दिली आहे. रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून आपले कर्तव्य बजावणारे डॉ. तारि...
मनपा क्रीडा धोरणासंदर्भात आम आदमी पार्टीने विविध सकारात्मक धोरणात्मक मागण्या
पिंपरी चिंचवड

मनपा क्रीडा धोरणासंदर्भात आम आदमी पार्टीने विविध सकारात्मक धोरणात्मक मागण्या

मनपाच्या क्रीडा धोरणात ऑलिम्पिक विचारांचा दृष्टिकोन ठेवा पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवडच्या वतीने आज आयुक्त शेखर सिंह यांना व्यापक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या बद्दल आम आदमी पार्टीच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष राहुल धोत्रे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी महाराष्ट्र राज्यसरकारच्या २००१ च्या क्रीडा धोरणातील विविध शिफारशीचा अवलंब मनपा प्रशासनाने केलेला नाही.पायाभूत सुविधासह भारतीय मैदानी व ऑलिम्पिक दर्जाच्या खेळासाठी शहरातील खाजगी व सरकारी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देणारे मनपाचे क्रीडा धोरण असले पाहिजे,त्यासाठी आम्ही खालील मागण्या आयुक्त साहेबांना केलेल्या आहेत असे आप क्रिडा आघाडी अध्यक्ष राहुल धोत्रे यांनी सांगितले. 'आप'च्या व्हिजन डाक्युमेंट मध्ये आमचे क्रीडा धोरण स्पष्ट करत आहोत असे शहर कार्यकारी...
श्री गजानन बाल संस्कार केंद्राची घोरदेश्वर येथील सहल उत्साहात 
पिंपरी चिंचवड

श्री गजानन बाल संस्कार केंद्राची घोरदेश्वर येथील सहल उत्साहात

पिंपरी : लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.. या म्हणीप्रमाणे नेवाळे वस्ती चिखली (Chikhali) येथे श्री गजानन बाल संस्कार केंद्र प्रत्येक रविवारला घेण्यात येते. केंद्राच्या वतीने घोरदेश्वर येथे बालचमूंसची सहल काढण्यात आली होती. सकाळी साडेसहाला नेवाळे वस्ती येथून घोरदेश्वरला निघाले व सात वाजता डोंगर चढण्यास सुरुवात झाली. सहली मध्ये ४ वर्षाच्या बालपासून ते १२ वर्षाचे बालक सहभागी झाले होते. सर्वजण प्रथमच डोंगर चढत होते. त्यामुळे डोंगर चढतांना सर्वांना खूपच मजा आली, वरती पोहचल्या नंतर सर्वांनी व्यायाम केला तसेच खेळ सुद्धा झाले नंतर पद्य म्हटले नंतर सर्वांनी घरून आणलेला नाश्ता केला. या साहिलीमुळे मुलामध्ये गड किल्ले बघण्याची ओढ निर्माण झाली. बालवयात अशा प्रकारचे छंद निर्माण होणे, खूप महत्वाचे. या सहलीचे आयोजन मंगेश पाटील यांनी केले होते. या सहलीमध्ये त्यांना श्रीकृष्ण काशीद, चिरतन कुलकर्...
दिव्याखाली अंधार ; स्वच्छ सर्वेक्षणावर लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेच्या निगडी स्मशानभूमीतील स्वच्छतागृह दोन वर्षांपासून बंद 
पिंपरी चिंचवड

दिव्याखाली अंधार ; स्वच्छ सर्वेक्षणावर लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेच्या निगडी स्मशानभूमीतील स्वच्छतागृह दोन वर्षांपासून बंद

पिंपरी : निगडी अमरधाम स्मशानभूमीतील शौचालयाची दुरावस्था झाल्याने हे शौचालय तब्बल दोन वर्षांपासून बंद आहे. यामुळे प्रशासनाच्या (PCMC) वतीने नवीन शौचालय बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. परंतू या कामास पाच महिन्यांचा कालावधी उलटून देखील महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून अद्यापही काम पूर्ण करण्यात आलेले नाही. अत्यंत संथ गतीने चाललेल्या शौचालयाच्या बांधकामामुळे तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन शौचालयाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी (Nigdi) अमरधाम स्मशानभूमीमधील सार्वजनिक शौचालयाला बांधून तब्बल तीस वर्षे झालेली आहेत. हे शौचालय अत्यंत जीर्ण झाले असून त्यातील भिंतींना मोठ-मोठे ...
सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध 
पिंपरी चिंचवड, राजकारण

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध

अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेऊन पदमुक्त करा - अजित गव्हाणे बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. ०७ : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांची सातत्याने बेताल आणि बेजाबदार वक्तव्ये सुरू असून तमाम महिलांचा अवमान या मंत्र्यांकडून केला जात आहे. आमच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासारख्या संसदरत्नाबद्दल अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेली वक्तव्ये ही अत्यंत अश्लाघ्य, निंदनिय आणि निषेधार्ह आहेत. सत्तार यांनी केवळ माफी मागून चालणार नसून त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मत प्रदर्शित करताना अत्यंत खालच्या स्तराची भाषा वा...
काळेवाडीतील २२ वर्षीय शिक्षिकेचा डेंग्यूने मृत्यू 
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

काळेवाडीतील २२ वर्षीय शिक्षिकेचा डेंग्यूने मृत्यू

पिंपरी : डेंग्यू झाल्याने काळेवाडीतील एका २२ वर्षीय तरुण शिक्षिकेचा शुक्रवारी (ता. ४) एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. शिक्षक घराण्यातील ही तरुणी नुकतीच पिंपरीतील पोतदार शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. ऋतुजा श्रावण भोसले (वय २२ रा. साईनाथ कॉलनी, काळेवाडी) असे या मृत शिक्षिकेचे नाव आहे. या शिक्षिकेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे बोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, ऋतुजाचे वडील श्रावण भोसले हे देखील काळेवाडीतील एका शिक्षण संस्थेत क्रिडा शिक्षक आहेत. ...
पत्नीसोबत तीच्या मित्राला घरात पकडले | भोसकून दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पत्नीसोबत तीच्या मित्राला घरात पकडले | भोसकून दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून

पिंपरी : पत्नीसोबत घरात सापडलेल्या तिच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिले. यात पत्नीच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. २६ ऑक्टोबर २०२२) रात्री साडे दहाच्या सुमारास पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील मोशीत घडली. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात (Bhosari MIDC Police) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पंकज शिंदे (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, निलेश अशोक जोर्वेकर (वय ३७) असे खून करण्यात आलेल्या पत्नीच्या मित्राचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी मी गावाला जात आहे. असं पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. याच दरम्यान, पंकजच्या पत्नीला मयत निलेश अशोक जोर्वेकर भेटायला आला. पंकजची पत्नी...
उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनची स्वरामृत दिवाळी पहाट उत्साहात 
पिंपरी चिंचवड

उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनची स्वरामृत दिवाळी पहाट उत्साहात

''आम्ही विठ्ठलाचे वारकरी'' च्या गजरात अख्ये पिंपळे सौदागर न्हाऊन निघाले सोसायटी वर्गाच्या भरगच्च उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली... पिंपरी (प्रतिनिधी) : '' आम्ही विठ्ठलाचे वारकरी, दिन गेले भजनाविना सारे '' या गजरात अख्ये पिंपळे सौदागर न्हाऊन निघाले. उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आयोजित '' स्वरामृत दिवाळी पहाट '' ही आनंद, उत्साह अन् जल्लोष सर्वत्र नावीन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई, संपन्नतेचे प्रतीक घेऊन आली. पिंपळे सौदागरवासियांच्या उपस्थितीत आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायकांच्या स्वरसुरांनी दीपोत्सवाचे आगमन झाले. त्यांच्या गायनात रसिक श्रोते अक्षरक्ष: भारावून गेले. एका पेक्षा एक सरस अशी भक्ती आणि भावगीत सादर करून सा रे ग म प लिटल चॅम्प्स उपविजेता सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, सुप्रसिद्ध गायक...
शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप
सिटिझन जर्नालिस्ट

शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप

काळेवाडी, दि. 22 ऑक्टोंबर 2022 : अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने नागरिकांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन त्यांचे जीवन सुखमय व्हावे. या हेतूने शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सचिन काळे या दांपत्याने सुमारे 6,000 कुटूंबांना दिवाळीनिमित्त पणत्या वाटप करत दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. मागील तीन वर्षापासून काळे हा उपक्रम राबवत आहेत. सचिन काळे व कोमल काळे यांचे सामाजिक कार्य सर्वश्रृत आहे. ते नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवून आपणही समाज्याचे देणे लागतो, याची नेहमीच जाणीव करून देत असतात. कोणताही सण किंवा उत्सवात नागरिकांच्या आनंदातच आपला आनंद शोधणारे काळे दांपत्य आता नागरिकांच्या हक्काचे नेतृत्य म्हणून...