कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे आणि विकत घेणाऱ्या आरोपीस अटक; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मावळ, दि.३० (लोकमराठी) - मावळ तालुक्यातील कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे तीन आरोपी आणि विकत घेणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
डंपर चोरणारे विष्णू भगवान जाधव (रा. गोळेवाडी तळेगाव दाभाडे), ड्रायवर अमोल चौगुले , कृष्णा सीताराम देवकर (वय २५ रा. मुलुंड जि. ठाणे) आणि विकत घेणारा रवी अंकुश लष्कर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; कामशेत पोलीस स्टेशन गु.र.नं २५६/२०२२ भादवि कलम ३७९ नुसार दाखल झाला होता. विजय विठ्ठल गायकवाड वय ४८ रा.कांब्रे ता.मावळ जि. पुणे यांनी फिर्याद दिली की; दि.२९/१२/२०२२ रोजी रात्री माझा पुतण्या रोशन गायकवाड याचे मालकीचा डंपर क्र.MH 46 F 4857 हा टायर पंक्चर झाल्यामुळे पुणे मुंबई हायवे लगत कामशेत येथील HP पेट्रोल पंपावर डंपर वरील ड्रायवर अम...










