रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पिंपरी दि. १५ (लोकमराठी) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
दि.१४ रोजी सकाळी पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघ कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय जिल्हा संघचालक विनोद बन्सल,सांगवी गट संघचालक लक्ष्मण पवार, जनकल्याण समितीचे विनोद देशपांडे, महेंद्र बोरकर, नरेंद्र पेंडसे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते.
समरसता मंचातर्फे पाणपोई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी रा.स्व. संघाच्या समरसता विभागाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्यान, उपक्रमांच्या आयोजनासोबतच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर...










