Tag: pcmc

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिला काँग्रेसचे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिला काँग्रेसचे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू

पिंपरी, ता. १९ मे : मागील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे जाहीर आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याऐवजी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मागील अडीच वर्षांपासून दिवसाआड व अनियमित कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. याला लोकप्रतिनिधी आणि भाजपचे पदाधिकारी जबाबदार आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करू असे प्रशासनाने अनेकदा आश्वासन देऊन देखील अद्यापही पाणीपुरवठा पूर्णवेळ व सुरळीतपणे सुरू झालेला नाही याचा जाब विचारण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळपासून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित महिला प्रशासनास जाब विचारीत आहेत की, पवना धरण १०० टक्के भरून देखील पाणीपुरवठा सुरळीत का केला जात नाही. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्र...
राष्ट्रीय स्पर्धेत आदित्य बुक्की याची दोन सुवर्ण तर अब्दुल शेख याची एक सुवर्ण पदकांची कमाई
क्रीडा

राष्ट्रीय स्पर्धेत आदित्य बुक्की याची दोन सुवर्ण तर अब्दुल शेख याची एक सुवर्ण पदकांची कमाई

पिंपरी : छत्तीसगड मुख्यमंत्री चषक आणि पहिला AITWPF फेडरेशन कप २०२२, राष्ट्रीय पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन चॅम्पियनशिप, जी सरदार बलबीर सिंग जुनेजा इनडोर (एसी) स्टेडियम, रायपूर, छत्तीसगड येथे १२ ते १५ तारखेदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय स्पर्धेत १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५१८ खेळाडूंनी भाग घेतला. हा कार्यक्रम छत्तीसगड पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन असोसिएशनने आयोजित केला होता आणि अखिल भारतीय पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन फेडरेशन AITWPF द्वारे मान्यता दिली होती. या चॅम्पियनशिपमध्ये, मणिपूर राज्याने पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि CM ट्रॉफी आणि पहिला फेडरेशन कप २०२२ जिंकला, म्हणजे हरियाणा आणि नागालँडने पारंपरिक कुस्तीमध्ये अनुक्रमे २ रे आणि ३ रे स्थान जिंकले. आणि केरळ आणि छत्तीसगडमध्ये पँक्रेशन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क...
महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित पलोगेथोन अभियानात 6.5 टन कचरा संकलन
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित पलोगेथोन अभियानात 6.5 टन कचरा संकलन

पिंपरी, ता. 8 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने रविवारी (ता. 8) केएसबी चौक ते टाटा मोटर्स रस्त्यावर पलोगेथोन अभियान आयोजित करण्यात आले होते. या मोहमेअंतर्गत सुमारे 6.5 टन कचरा संकलन करण्यात आला. या अभियानात सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे यांच्यासह टाटा मोटर्सचे अधिकारी व्ही. टी. पाटील आदी सहभागी झाले होते. रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, राजेंद्र उज्जैनवाल, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कांचनगौडार, सचिन जाधव, शैलेश वाघमारे, विक्रम सौदाई, बिव्हीजी इंडिया व टाटा मोटर्सचे (Tata Motors) अधिकारी यांचेसह सुमारे दोनशे कर्मचारी सहभागी झाले होते....
महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. 26 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता, थेरगाव, सांगवी व यमुना नगर रूग्णालायातील कंत्राटी पद्धतीने नेमलेले वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी असे सुमारे 350 कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून पगाराविना काम करत आहेत. ठेकेदार त्यांना वेळेवर पगार देत नसून फेब्रुवारीपासून त्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले असून आज जिजामाता रूग्णालयात या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून महापालिका प्रशासानाला जागे केले. दोन दिवसात वेतन देण्याचे ठेकेदाराने लेखी आश्वासन दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. असे या ठेकेदाराचे नाव असून 1 ऑक्टोंबर 2021 पासून या ठेकेदाराला महापालिकेने वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी पुरविण्यासाठी नेमले आहे. त...
रहाटणीत ‘शासन आपल्या दारी’ व महाआरोग्य शिबिराचा १५०० नागरिकांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड

रहाटणीत ‘शासन आपल्या दारी’ व महाआरोग्य शिबिराचा १५०० नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन व पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी हा उपक्रम गुरूवारी रहाटणीतील विमल गार्डन येथे संपन्न झाला. रहाटणी, काळेवाडी, थेरगाव परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शासकीय दाखले यावेळी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे १५०० नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड नोंदणी व दुरूस्ती, नॉनक्रिमीलीअर दाखला, संजय गांधी निराधार योजनेतील विविध दाखले, श्रावण बाळ योजनेतील विविध दाखले तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कार्यालय निगडी यांच्या वतीने नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका, नावे कमी करणे, विभक्त शिधापत्रिका, रास्तभाव दुकान बदलणे, पत्ता बदलणे आदी शिधापत्रिकेतील बदल नागरिकांनी यावेळी केले....
वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका साजरे करतेय माझी वसुंधरा अभियान – प्रशांत राऊळ
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका साजरे करतेय माझी वसुंधरा अभियान – प्रशांत राऊळ

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका माझी वसुंधरा अभियान साजरे करत आहे. अशी टिका पर्यावरण मित्र प्रशांत राऊळ यांनी केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी महापालिका असंवेदनशील असून शहरात बेसुमार झाडांची कत्तल सुरू आहे. महापालिकेनेच पवना नदीत मैला मिश्रित पाणी सोडून तीला गटार करून टाकले आहे. शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर शहराला फक्त शिकलेलाच आयुक्त गरजेचा नसून एक जागृत, सक्रिय आणि संवेदनशील आयुक्त असणे गरजेचा आहे. असेही राऊळ यांनी म्हटले आहे. राऊळ यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाची खिल्ली उडवताना खालील मुद्दे मांडले आहेत. पंचतत्वे जल - १. पालिका हद्दीत नदीमध्ये मैला मिश्रित पाणी सोडणे २. पालिका व इतर अपुरे STP प्रकल्प ३. नदी प्रदूषण करणाऱ्या ...
भोसरीच्या घाटात पुन्हा सुरु होणार बैलगाडा शर्यत : ॲड. नितीन लांडगे
पिंपरी चिंचवड

भोसरीच्या घाटात पुन्हा सुरु होणार बैलगाडा शर्यत : ॲड. नितीन लांडगे

पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) भाजपाचा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा दिला. मा. सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर बैलगाडा शर्यत घेण्यास परवानगी दिल्यामुळे आता लवकरच भोसरीतील घाटावर पुन्हा बैलगाडा शर्यत सुरु होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे. गुरुवारी ॲड. नितीन लांडगे यांनी पुणे जिल्हा गाडा मालक संघटनेचे अध्यक्ष भानूदास लांडगे यांच्या सह भोसरीतील घाटाची पाहणी केली व आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता बोपन्ना गट्टूवार यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक पंडीत गवळी, गाडा मालक अनिकेत विष्णू लांडगे तसेच गाडा मालक संघटनेचे पदाधिकारी व भोसरीतील गाडा मालक उपस्थित होते....
रहाटणी-काळेवाडीतील रस्ते दुरूस्त करा ; माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी
पिंपरी चिंचवड

रहाटणी-काळेवाडीतील रस्ते दुरूस्त करा ; माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी

पिंपरी, ता. ११ : रहाटणी - काळेवाडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून नागरिक त्रस्त आहेत. रहाटणी - काळेवाडीकरांची रस्ते समस्या महापालिकेने मार्गी लावावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे. याबाबत तापकीर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी - काळेवाडी परिसरातील श्रीनगर, शास्त्रीनगर, तापकीरनगर, जोतिबानगर, काळेवाडी गावठाण, आझाद चौक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तीन ते सहा महिन्यांपासून अंतर्गत रस्ते खोदून ठेवल्याने रहिवाशांना ...
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता
राजकारण, मोठी बातमी

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. ७ : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार स्वतःकडे घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंत्रिमंडळाने मंजूर केलेले विधेयक विधान सभेत मांडण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे महाराष्ट्र सरकार कायदा करणार आहे. या कायद्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे. निवडणूक आयोगाने एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. मात्र राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईस तीन महिने अवधी हवा आहे. त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचे घाट घातला आहे. म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी दोन विधेयकां...
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश नखाते फाउंडेशनतर्फे समाजोपयोगी उपक्रम
पिंपरी चिंचवड

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश नखाते फाउंडेशनतर्फे समाजोपयोगी उपक्रम

रहाटणी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, कोविड योद्धांचा सन्मान व हळदी-कुंकू कार्यक्रम असे विविध समाजोपयोगी उपक्रम गणेश शिवराम नखाते सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आले. या कार्यक्रमांचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश नखाते, सुमन नखाते, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर व संदीप नखाते, देविदास आप्पा तांबे, नरेंद्र माने, मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, विनोद नखाते, माधव मनोरे, दिपक जाधव, नामदेव शिंत्रे, किशोर नखाते (युवा महाराष्ट्र केसरी), निलेश नखाते (पिंपरी चिंचवड केसरी), प्रशांत मोरे, मनोज नखाते, आशुतोष नखाते, अमोल नखाते, सुभाष दराडे, नंदुशेठ गोडांबे, भगवान गोडांबे, बाळासाहेब गावडे, स्वप्निल नखाते यांच्यासह फाउं...