पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव | बंदोबस्त न केल्यास संभाजी ब्रिगेड महापालिकेत सोडणार मोकाट कुत्री
पिंपरी : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने आठ दिवसात या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिका भवनात त्यांना आणून सोडण्यात येतील. असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक दिवसांपासून शहरात विविध भागातील गर्दीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आणि अश्यातच रस्त्यारस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. काही ठिकाणी तर लहान मुलं, महिलांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पुढे अचानक ही कुत्री येऊन अपघात होत...