Tag: pcmc

बोऱ्हाडेवाडीतील धोकादायक झाडाची छाटणी करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

बोऱ्हाडेवाडीतील धोकादायक झाडाची छाटणी करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड (बाळासाहेब मुळे) : बोऱ्हाडेवाडी-विनायक नगर येथील कॉलनी क्रमांक एकमध्ये एक कडुलिंबाचे झाड रस्त्यावरती झुकले आहे. त्यामुळे ते कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून या झाडाची छाटणी करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांकडून या झाडाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवले. पण याकडे कानाडोळा केला जात आहे. महापालिकेकडेही तक्रार दिलेली आहे. जवळच मराठी माध्यमाची महापालिकेची व एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असते. हे झाडं रस्त्यावरती झुकलेले असल्याने जोरदार वाऱ्यामध्ये ते पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर महापालिका उद्यान विभागाने झाडाच्या छाटण्याची व्यवस्था करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे....
झोपडपट्टी भागातील लहान मुलांची आरोग्य तपासणी करा – दिपक चखाले
पिंपरी चिंचवड

झोपडपट्टी भागातील लहान मुलांची आरोग्य तपासणी करा – दिपक चखाले

वाकड : (Wakad) येथील काळाखडक झोपडपट्टी, म्हातोबानगर झोपडपट्टी व अण्णाभाऊ साठे नगर झोपडपट्टी भागातील दहा वर्षापर्यंतच्या मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी होणे गरजेची आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येक झोपडपट्टीत एक दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी केली आहे. याबाबत चखाले यांनी (PCMC) महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले असून त्याची प्रत जेष्ठ वैद्यकीय अधीकारी डाॅ. अभय दादेवार व डाॅ. शितल शिंदे यांची सादर केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या (Corona) तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेत तसेच एक ते दीड वर्षापासुन लहान मुले घरी आहेत. त्यात आँनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून काही शारीरीक व मानसिक परिणाम झालेले आहेत का? पावसाळी साथीचे रोग सर्दी, खोकला, ताप किंवा (ENT) कान, नाक, घसा व अन...
घरगुती गणपती : भोसले परिवाराने साकारला शनिवारवाडा व विसर्जन मिरवणूकीची प्रतिकृती
पुणे

घरगुती गणपती : भोसले परिवाराने साकारला शनिवारवाडा व विसर्जन मिरवणूकीची प्रतिकृती

https://youtu.be/TKOCmYDcZlY चव्होली बुद्रुक : येथील रहिवासी भोसले परिवाराने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा व त्यासमोर पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली विसर्जन मिरवणूकीची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून तयार केलेला हा देखावा नागरिकांचे आकर्षण ठरला आहे. भोसले परिवार यांच्या घरी अनेक वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी भोसले परिवार गणपतीची आरस करताना नवनवीन प्रयोग करत असतो. या वर्षी त्यांनी पुठ्ठ्याच्या सहाय्याने शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती तयार केली असून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. या प्रवेशद्वारासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखाव्यात आणखीनच भर टाकत आहे. प्रियंका अमोल भोसले यांचा हा देखावा आकर्षण ठरत असून देखावा साकारण्यासाठी त्यांचे पती अमोल, सासरे सूर्यकांत वामन भोसले व भ...
महिला अत्याचार निषेधार्थ मनसेचे पिंपरीत आंदोलन
पिंपरी चिंचवड, राजकारण

महिला अत्याचार निषेधार्थ मनसेचे पिंपरीत आंदोलन

पिंपरी : राज्यभरात महिलांवर वारंवार घडत असलेल्या अत्याचाराविरोधात नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला सेना शहराध्यक्षा अश्विनी बांगर, शहर सचिव सीमा बेलापुरकर, उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, संगिता देशमुख, विद्या कुलकर्णी, वैशाली बोत्रे, वैशाली कोराटे, अनिता नाईक, श्रद्धा देशमुख, संगीता कोळी, काजल गायकवाड, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, के के कांबळे, आकाश लांडगे, रोहित थरकुडे, किरण वाघेरे, वाहतूक सेना अध्यक्ष सुशांत साळवी, कर्मचारी सेना अध्यक्ष रूपेश पटेकर, विशाल सालूंखे, विशाल मानकरी, राजू भालेराव, राजेश अवसरे, परमेश्वर चिल्लरगे, नारायण पठारे, अलेक्सझांडर आप्पा मोझेस, नाथा शिंदे, सुरेश ...
दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही – वैशाली काळभोर
पिंपरी चिंचवड, ताज्या घडामोडी

दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही – वैशाली काळभोर

पिंपरी, ता. १५ : पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान करीत त्यांचा आदर केला जातो. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घेवून आम्ही महिला लोकनेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजकारण आणि राजकारणात काम करीत आहोत. या महाराष्ट्रात मनुवादी विचारांच्या भाजपने यापूर्वीही महिलांबाबत निंदाजनक वक्तव्य केले आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांचा पुन्हा अपमान केला आहे त्यांनी तमाम महिलांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही असे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैशाली काळभोर यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पिंपरीत महात्मा फुले पुतळ्यासमोर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. यावे...
मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश
पिंपरी चिंचवड, सामाजिक

मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश

पिंपरी : मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हिताय सोशल फाउंडेशन संस्थेच्या सामाजिक बंधुत्वाचा प्रत्यय खराळवाडी - गांधीनगर येथे आला. मानवता हिताय या संस्थेच्या या उपक्रमाचे समाजात कौतुक होत आहे. https://youtu.be/_-oMy2SAAeA त्यावेळी मानवता हिताय संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, तसलीम शेख, कासीमभाई शेख, अब्दुलभाई शेख, इमरान शेख (गुड्डू), सैफी आलम, मोहम्मद आमीर, नामदेव (आबा) जाधव आदी उपस्थित होते. गणेशोत्सवनिमित्त मानवता हितायने हा एक सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला असून समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, मानवता हिताय संस्थेतर्फे गणेशोत्सवानिमित्त सलग दहा दिवस गरजू, गरीब व दिव्यांगांना धान्यकिट वाटप करण्याचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. असे मानवता हिताय संस्थे...
समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे – सचिन साठे
पिंपरी चिंचवड

समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे – सचिन साठे

निरपेक्षपणे काम करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये न्याय मिळतो पिंपरी, ता. १२ : न्याय व्यवस्थेवरील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अन्यायग्रस्त पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे असे आवाहन काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. तसेच काँग्रेस पक्षात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच न्याय मिळतो असेही सचिन साठे म्हणाले. रविवारी (ता. १२ सप्टेंबर) आकुर्डी येथे शहर काँग्रेसच्या लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, मयूर जयस्वाल, मकरध्वज यादव, प्रतिभा कांबळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, विशाल कसबे; चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे आदी उपस्थित होते. यावेळी शहर काँग्रेसच्या लीगल स...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ व २२ मधील नागरिकांसाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले जाणार असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा काळेवाडीतील बी. टी. मेमोरियल शाळेत रविवारी (ता. २६ सप्टेंबर) होणार आहे. या स्पर्धेचे संयोजन मनसे पिंपरी विधानसभा उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे व शहर उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांनी केले आहे....
PCMC : गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था
पिंपरी चिंचवड

PCMC : गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था

पिंपरी, ११ सप्टेंबर:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली असून सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी विसर्जनासाठी मूर्ती द्याव्यात असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विसर्जन ठिकाणी गर्दी होवू नये या साठी सर्व विसर्जन घाट व हौदावर यावर्षी गतवर्षी प्रमाणे कोरोनामुळे निर्बंध आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उत्साही व आनंदी वातावरणात साजरा व्हावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.शहरातील विविध भागामध्ये श्री गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था महापालिकेने केली असून त्याचे विेधीवत विसर्जन करण्यात येणार आहे असेही महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. श्री मूर्ती संकलनासाठी स्वतंत्र सजवलेले रथ तयार केले असून...
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पिंपरी चिंचवड, सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

काळेवाडी : साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप व जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काळेवाडी-तापकीर नगरमधील साई मल्हार मेडिकल शेजारी, तापकीर चौक येथे शनिवारी (ता. ४ सप्टेंबर) सकाळी १० ते ४ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. करोनाच्या काळामध्ये नागरिकांना अनेक आरोग्य विषयक समस्या भेडसावत आहेत. नागरिक आरोग्य विषयक समस्याकडे दुर्लक्ष करतात, आजाराचे वेळीच निदान न झाल्याने पुढे गंभीर परिस्थिती उदभवू शकते, नागरिकांची ही अडचण ओळखून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या तपासण्या होणार ई.जी.सी., रक्तातील साखरेचे प्रमाण, हाडांची ठिसूळता, शरीरातील हिमोग्लोबिन...