Tag: pcmc

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानने केला सामुदायिक तुळसी विवाह संपन्न
पिंपरी चिंचवड

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानने केला सामुदायिक तुळसी विवाह संपन्न

चिंचवड, (लोकमराठी) : शिवतेजनगर येथील श्री स्वामी स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर येथे सामुदायिक तुलसी विवाह करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील सुमारे २० कुटूंबांनी आपल्या घरातील तुलसी सजवून आणल्या होत्या. तुलसी विवाह श्री निर्मल गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला, हा विवाह सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थिती लावली होती. विवाह लागल्यानंतर फटाके फोडण्यात आले तसेच सर्वांना लाडूचा प्रसाद देण्यात आला. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, संतोष शेळके, मंगेश पाटील, अशोक खडके, कैलास मुळे, अर्चना तोंडकर, अंजली देव, नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले. Advertisement...
मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई

पिंपरी, (लोकमराठी) : डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत मोशी बो-हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम व्यावसायिकाच्या लेबर कॅम्प परिसरात डेंग्यू सदृश्य आळ्या निदर्शनास आल्याने त्यावर आवश्यक फवारणी करण्यात आली व पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई नुकतीच करण्यात आली. डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत. मंगळवार (दि. १२) रोजी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम. भोसले, आरोग्य निरीक्षक व्ही.के. दवाळे, राजेंद्र उज्जैनवाल, वैभव कांचन गौडार, सचिन जाधव, संपत भोईटे यांच्या पथकामार्फत का...
नदीपात्रातील कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू – विशाल वाकडकर
पिंपरी चिंचवड

नदीपात्रातील कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू – विशाल वाकडकर

पिंपरी-चिंचवड, (लोकमराठी) : देहुरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावर रावेत उड्डाणपूलाखाली नदिपात्रात मागील अनेक दिवसांपासून कचरा टाकण्यात येत आहे. तो कचरा पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने ताबडतोब उचलावा व कचरा टाकणा-या संबधित ठेकेदारांवर किंवा जबाबदार असणा-या व्यक्तींवर प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पुढील दोन दिवसात तो कचरा आयुक्तांच्या कार्यालयात आणून टाकू असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. रावेत जलउपसा केंद्राच्या वरच्या टप्प्यात हा कचरा टाकण्यात येत आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त अस्वच्छ पाणी नदीतील पाण्यात मिसळत आहे. तेच दुषित पाणी रावेत जलउपसा केंद्रातून शहरातील 25 लाखांहून जास्त लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी उचलले जाते. या पाण्यात कच-यातील हानीकारक जीवजंतू आणि त्य...
पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी नचिकेत बालग्राम अनाथ आश्रमात
पिंपरी चिंचवड

पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी नचिकेत बालग्राम अनाथ आश्रमात

पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांनी नचिकेत बालग्राम अनाथआश्रमात साजरी केली दिवाळी पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चच्या आर्ट सर्कल विभागातील विद्यार्थ्यांनी यावर्षी दिवाळी ‘नचिकेत बालग्राम’ या अनाथ आश्रमात साजरी केली. आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त फराळ, स्वत: रंगविलेल्या पणत्या, आकाश कंदिल नचिकेत बालग्राममधील विद्यार्थ्यांना भेट दिल्या. तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूदेखील देण्यात आल्या. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. एच.यू. तिवारी, आर्ट सर्कलच्या समन्वयक प्राध्यापिका प्रिया ओघे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनात वैष्णवी पाटील, चिन्मय जगताप, रोहित दिवेकर, आयुष केदारी, तमन्ना विश्नोई, नेहूल गुप्ता, ज्ञानदा, जुई पाणगरे, झैद रिजवान पिंजारी, स्वराज पवार आदींनी सहभाग घेतला. पीसीईटी...
गणेशमूर्ती परवानगीच्या भूई भाड्यात महापालिकेने केली सहापट वाढ
पिंपरी चिंचवड

गणेशमूर्ती परवानगीच्या भूई भाड्यात महापालिकेने केली सहापट वाढ

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आकारल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती परवानगीच्या भूईभाड्यात वाढ करण्यात आली आहे. एक हजार रुपयांवरुन सहा हजार रुपये करण्यात आले आहेत. प्रदूषण निर्मूलन शुल्काचे कारण देत तब्बल पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे गणेश मूर्ती विक्रेत्यांवर संक्रांत ओढवली आहे. गणेशोत्सवात पाश्र्वभूमीवर गणेशमूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांकडून शहरात तात्पुरत्या स्वरुपात स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात दरवर्षी शेकडो स्टॉल्स उभारले जातात. महापालिकेकडून स्टॉल्सला परवानगी देताना भूईभाडे आकारले जाते. गतवर्षी एक हजार रुपये भूईभाडे अधिक जीएसटी (वस्तू व सेवा कर) असे परवाना शुल्क महापालिकेने आकारले होते. त्यामुळे अधिकृतपणे परवाना घेऊन स्टॉल्स उभारणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, यंदा महापालिकेने सहापटीने भूईभाडे वाढविले आहे....
भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार

पुलाचा खर्च ७१ लाखावरून थेट ७.५ कोटीपर्यंत वाढलेल्या खर्चाची चौकशी करून दोषींवर कारवाईची अपना वतनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पिंपरी (लोकमराठी) : पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील शीतलबाग पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखांवरून थेट ७.५ कोटीच्या वर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्राप्त माहिती अधिकारातील कागदपत्रानुसार हा प्रकार निदर्शनास आला असून त्यामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे व दाबामुळे तसेच प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, शीतलबाग पादचारी पुलाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत भाजपचे शहराध्यक्ष व...
कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना

Lok Marathi News Network पिंपरी चिंचवड : शहरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी स्वतः वारंवार मागणी करूनही कचरा प्रश्न मार्गी लावण्यात महापालिकेला अपयश आले आहे. काहीही असले तरी आरोग्यप्रमुख व आयुक्त श्रावण हर्डीकर हेच या समस्येला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी येत्या शनिवारपर्यंत (दि. १३) तातडीने तोडगा काढावा. अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने रविवार (दि. १४) सकाळी १० वाजता आयुक्त हर्डीकर यांच्या बंगल्यावर डस्टबिन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी दिला आहे. १ जुलै पासून आरोग्य विभागाने कचरा संकलन व वाहनाचे काम बीव्हीजी इंडिया व ए. जी इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपन्यांना दिले आहे. त्यापोटी त्यांना लाखो रुपये देण्यात येणार आहेत. परंतु आठवडा उलटून गेला तरी या दोन्ही कंपन्यांन...