PUNE : पुण्याचे तापमान चाळिशीपार!
File photo
पुणे (लोकमराठी) : पुणे शहर आणि परिसरातील दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा यंदाच्या हंगामात प्रथमच चाळिशीपार गेला आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने पुणेकरांना दिवसा घरातही उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडय़ाचा सामना करावा लागतो आहे. वाढलेल्या तापमानासह थंडावा मिळविण्यासाठी घरातील वातानुकूलित यंत्र आणि पंख्यांचा वापर वाढला आहे. तापमानातील ही वाढ कायम राहणार असून, पुढील आठवडाभर दिवसाच्या तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे शहरासह परिसरामध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवडय़ात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास होता. याच कालावधीत राज्यात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढल्याने ढगाळ स्थिती निर्माण झाली. त्यात शहराच्या क...








