Tag: Pune

चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती
सामाजिक

चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती

चिंचवड, ता. ३१ : भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तीन महिन्यांपासून आयोजित केलेल्या वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती आश्विन पौर्णिमेला झाली. ही प्रवचन मालिका प्रबुद्ध संघ चिंचवडगाव येथे राबविण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहर महासचिव अशोक सरपाते, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आयुष्यमान एस. एल. वानखेडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास जगताप उपस्थित होते. उल्हास जगताप यांच्या हस्ते १० वी १२ उत्तीर्ण मुलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बौद्धांची विश्व विद्यापीठे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध संघाचे सचिव निशांत कांबळे, उपाध्यक्ष अल्पणा गोडबोले, खजिनदार आयुष्यमती अनुराधा सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा वार्ड अध्यक्ष किशन बलखंडे, पदाधिकारी किशोर सोनवणे, डॉ. धर्मेंद्र रामटेके, प्रतिमा साळवी,...
PCMC : जिजामाता रुग्णालयाच्या डॉ. वैशाली यांचे तात्काळ निलंबन करा; जागृत नागरिक महासंघाची मागणी
पिंपरी चिंचवड

PCMC : जिजामाता रुग्णालयाच्या डॉ. वैशाली यांचे तात्काळ निलंबन करा; जागृत नागरिक महासंघाची मागणी

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पहाटे 3:40 वाजता रुग्णालयात ऍडमिट होण्यासाठी गेलेल्या रुग्णाला रुग्णसेवा नाकारणाऱ्या व रुग्णहक्क सनदेचा अवमान करणाऱ्या जिजामाता रुग्णालयाच्या बेजबाबदार व उर्मट डॉक्टर वैशाली यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने डॉ. गोफणे यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी ज्या डॉक्टरांना रुग्णसेवा माहीत नाही तसेच रुग्णहक्क सनद माहित नाही, अशा डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये सेवेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. महापालिकेच्या उत्तम रुग्णसेवेच्या लौकिकास काळिमा फासणाऱ्या संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला मोठे आंदोलन उभे करावे लागेल असे खडसावून सांगितले.&nbs...
नवरात्रीनिमित्त ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

नवरात्रीनिमित्त ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने 'नऊ दिवस, नऊ सन्मान' या उपक्रमांतर्गत शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत युवक काँग्रेसच्या वतीने कु. संस्कृती गोडसे (सामाजिक क्षेत्र), कु. अंकिता नगरकर (वैज्ञानिक क्षेत्र), कु. खुशी मुल्ला (क्रीडा क्षेत्र), मोनिका गोळे-पेंढारकर (लोककला क्षेत्र), अमृता ओंबळे (कला क्षेत्र), प्राजक्ता रुद्रवार (शैक्षणिक क्षेत्र), डॉ. जागृती चव्हाण (वैद्यकीय क्षेत्र) आणि रेनी सजी (उद्योजक क्षेत्र) या रणरागिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने सत्कारमूर्तींना गौरवपत्र देण्...
PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल
पिंपरी चिंचवड

PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : काळेवाडी मुख्य रस्त्यावरील बस थांब्यांना शेड नाही. त्यामुळे उन, वारा, पावसात प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. वर्षानुवर्षे होत असलेली प्रवाशांची गैरसोय पहाता, तातडीने काळेवाडीत बंसथांबे शेडे उभारावेत. अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. काळेवाडीत परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे येथून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच प्रवाशांमध्ये महिला, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांचीही प्रमाण जास्त आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी बसथांबा शेडची गरज आहे, त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्टीलचे शेड न उभारता भलत्याच ठिकाणी ते उभारले आहे. काळेवाडी दवाखान्यासमोर असेच शेड आहे. विशेष असे शेड शहरात अगदी गल्लीत पहायला मिळतात. शेड नसलेले दोन्ही बाजूचे बसथांबे - बी. टी. मेमोरियल शाळेसमोर ...
युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान 
पिंपरी चिंचवड

युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

पिंपरी, ०२ ऑक्टोबर २०२३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी व राष्ट्रीय स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून काळेवाडी परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांचा युवक काँग्रेसतर्फे सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान, प्रदेश महासचिव प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, आरोग्य निरीक्षक वैभव केंचनगौडा व परिसरातील सफाई कर्मचारी उपस्थित होते. या वेळी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान पत्र, शॉल व पुष्प देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उप...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम

शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन प्रतिनिधी, २४ सप्टेंबर २०२३ : पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत आकुर्डी येथील वर्षा कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, यासाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधत शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या वर्षा कदम यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम थीम उभारले होते. त्याचबरोबर काळेवाडी येथील पूनम गोरे यांनी स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक पटकावले. त्यांनी नुकताच महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असलेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या थीमवर सजावट केली होती. स्पर्धेचे तिसरे बक्षीस रहाटणी येथील गीतांजली कुंभार पटकावले. या तिघांनाही आयोजकांच्या वतीने रोख...
PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’ 
शैक्षणिक

PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या भाटनगर प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ. जयश्री गणेश राऊत या विशेष कार्यासाठी महापालिकेकडून 'आदर्श शिक्षिका' ठरल्या आहेत. त्यांच्या सोळा वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी विदयार्थ्याच्यासर्वागीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवले. यात विशेष उपक्रम म्हणजे सध्याच्या काळात संगणक शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी मुलांना कोडिंगबाबत मार्गदर्शनावर भर दिला. त्यांचे विद्यार्थी स्क्रॅच या ऑनलाईन कोडिंग फलॅटफॉर्मवर कोडिंग करतात. तसेच त्यांनी विविध सर्जनशीलतेचा विकास घडवून आणणारे उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती या सुप्त गुणाचा विकास घडवून आणण्यासाठी राख्या बनविणे, गणेश मूर्ती बनविणे. पतंग तयार करणे, आकाशकंदिल बनविणे कागदी फुलपाखरे, पणत्या, भेटकार्ड, टाकाऊतून टिकाऊ वस्तू, कागदी पिशव्या बनविणे आईस्क्रीमच्या काड्यापासून वाॅल हैगिंग, फुलदाणी...
ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला तारक : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे
पिंपरी चिंचवड

ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला तारक : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे

काळेवाडी, राजवाडा लॉन्स : श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करण्यात आले. पिंपरी : ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यास ज्ञानाच्या तेजाचे चक्र तुमच्या भोवती फिरेल. ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला तारक असून मारक नाही. दररोज पाच मिनीटे तरी ज्ञानेश्वरीचे वाचन केले, तरी तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल होईल. असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी येथे केले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मातंग साहित्य परिषदेच्या वतीने येथील राजवाडा लाॅन्स येथे ज्ञानेश्वरी घरोघरी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत हेमंत हरहरे व नरेंद्र पेंडसे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी निवृत्त शिक्षण पर्...
PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ताज्या घडामोडी, क्राईम

PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे नराधम गजाआड पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२३ : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसताना तीच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला वाकड पोलीसांनी अटक केली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या भावाने याबाबत आरोपीला जाब विचारला असता, आरोपीनेच तीच्या भावाला कोणाला काही सांगितल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतीच्या भावाने काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे व सामाजिक कार्यकर्ते किरण नढे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नढे दांपत्याने पिडीतीच्या भावाला वाकड पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल केला. सौरभ सुरेश चव्हाण (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वाकड पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी काळेवाडीत आपला भा...
शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षा पदी शैला पाटील 
मनोरंजन

शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षा पदी शैला पाटील

पिंपरी (Lokmarathi News) : शिवसेना (शिंदे गट) चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या महिला शहराध्यक्षा पदी शैला चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेना उपनेते व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, शहर संघटीका सरिता साने आदी उपस्थित होते. शैला पाटील यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहेत. त्यामध्ये प्रेमरंग, बिंडी, सर्जा, तांडव सिरिअल दख्खनचा राजा, ऐकविरा आई, वेबसिरिज प्रेमाच्या पलिकडे या प्रमुख चित्रपट व सिरीयल मध्ये कामे केलेल्या असल्यामुळे शैला पाटील यांची पिंपरी चिंचवड शहराच्या शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाला शैला पाटील यांचा संघटना बांधण्यासाठी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. ...