पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा जाहीर निषेध
चिंचवड, ता. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात भिडे यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विनिता तिवारी, रोहित भाट, कुंदन कसबे, विक्रांत सानप, जिफिन जॉन्सन, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, सुभाष भुसने, सुमित सुतार व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. आता तरी त्या...










