Tag: Pune

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी 
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी

हडपसर, 23 सप्टेंबर 2024 (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी कॉलेज व साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी व 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हडपसरचे लोकप्रिय आमदार व रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय चेअरमन चेतन (दादा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे व महाविद्यालय विकास समिती सदस्य अमर (आबा) तुपे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, कर्मवीर संवादमाला, ...
विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ उत्साहात पुणेः विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्विरित्या करिअर करावे. विद्यार्थ्यांनो दुसऱ्याच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळते, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मांडले. ते येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ७व्या दिक्षांत समारंभा प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रतिष्ठित शास्त्रज्ञ इस्रो तथा यु.आर.राव उपकेंद्र, बंगळुरूचे संचालक डाॅ. एम. शंकरन, एमआयटी एडीटी विद्या...
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण

मूलभूत निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना करण्यात येते सन्मानित पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून विशिष्ट नियमांच्या अधिन राहून मूलभूत निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटराव पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध गणेश मंडळांची परीक्षणे करण्यात आली. गणेशोत्सव साजरा करत असताना मंडळांनी आवश्यक परवानग्या सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला नाविन्यपूर्ण संदेश देणारे उपक्रम डीजे ऐवजी परंपरागत वाद्यांचा वापर विसर्जन मिरवणुकीसाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे का? तसेच वैशिष्ट्यपूर्ण जन...
पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे
पिंपरी चिंचवड

पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे

महिला काँग्रेसचे महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन पिंपरी, दि. १७ : पावसाळा सुरू होण्याआधी शहरातील ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर लाईन व नाले सफाई तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती व विद्युत डीपी बॉक्स दुरुस्ती करा. अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महिला काँग्रेसने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे, उपाध्यक्षा आशा भोसले, परिवहन विभागाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा स्वाती शिंदे उपस्थित होत्या. महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील महावितरणच्या विद्युत ...
शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे ‘न्याय मशाल’ अभियान सुरू
राजकारण

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे ‘न्याय मशाल’ अभियान सुरू

लोकसभा निवडणूक प्रचारात न्यायपत्राचा काँग्रेसकडून प्रसार चिंचवड दि. २८ : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी "न्याय मशाल" आणि "न्याय तुतारी" अभियान मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राबवणार असल्याचे कळवले आहे. या अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाने दिलेल्या न्यायपत्र या जाहीरनाम्याचा प्रसार आणि उमेदवारांचा निवडणूक प्रचार करत दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी फिरत आहेत. या अंतर्गत काँग्रेस पक्षाने दिलेल्या सामाजिक भागीदारी, युवक, महिला, श्रमिक, शेतकरी या घटकांसाठी कल्याणकारी संकल्प रचताना कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा दोन यात्रा भारत जोडो आणि न्याय यात्रा करत राहुल गांधींनी जनतेची मते लक्षात ...
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड

महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

लोकमराठी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ व हिरकणी महिला संघाने आयोजित केलेला २८ वा वर्धापन दिन, स्नेहमेळावा व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ समाज बांधवांच्या भव्यदिव्य उपस्थितीत पार पडला. दिघी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती समाजसेवा संघाचे मुख्य प्रवर्तक सुभाष पवार, अनिल मोरे, सुनील साळुंखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गणेशपूजन करण्यात आले. यावेळी संघाचे जेष्ठ मार्गदर्शक शिवाजी सोनाटे, शांताराम बापू पवार, रमेश साळुंखे, रमेश सपकाळ, सहदेव भोसले, शिवाजी निकम, मधुकर पार्टे, माजी अध्यक्ष संतोष चिकणे व सर्व विभागीय सदस्य, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून निगडी येथील भक्ती-शक्ती येथे स्वच्छता मोहीम, वृ...
विवाहितेच्या छळाप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर कौटुंबिक हिंसाचार व अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल 
क्राईम

विवाहितेच्या छळाप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर कौटुंबिक हिंसाचार व अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

कॉंग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे पिडीतीच्या अन्यायला फुटली वाचा पिंपरी (प्रतिनिधी) - घरखर्चासाठी माहेरवरून पैशाची मागणी, स्त्रीधन असलेले मंगळसुत्र काढून घेतले. बँक खात्यातील दोन लाख काढून घेतले. तसेच तु आमच्या जातीची नाही, तुझे मुल आम्हाला नको, असे म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंद व दिर यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, लुटमार यांच्यासह इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. ही घटना १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान थेरगाव येथे घडली. याबाबत एका २३ वर्षीय पिडीत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती अशी की, एका मागासवर्गीय तरूणीबरोबर प्रेमाचे नाटक करून तीचा आयुष्यभर सांभाळ करिन असे सांगून आरोपी पतीने एक वर्षापुर्वी तीच्याशी लग्न केले. ते थे...
पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्यापासून महाअभियान; अयोध्येतील अक्षता पोहचणार घराघरात
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्यापासून महाअभियान; अयोध्येतील अक्षता पोहचणार घराघरात

पिंपरी दि.३१ (लोकमराठी)- अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पिंपरी चिंचवड समितीच्यावतीने दि.१ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत शहरातील घरोघरी जावून श्रीरामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अयोध्या येथील पूजित मंगल अक्षता वितरण करण्यात येणार आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासह देहू, आळंदी, देहूरोड कॅन्टोन्मेंट , हिंजवडी ग्रामपंचायत परिसरात हे निमंत्रण महाअभियान होणार आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पिंपरी चिंचवड समितीतर्फे शहर संयोजक धनंजय गावडे, सहसंयोजक महेश्वर मराठे, विश्व हिंदू परिषद पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी ही माहिती दिली. या निमित्ताने संपूर्ण देश, शहर पुन्हा राममय व्हावे, या हेतूने श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासातर्फे, पिंपरी चिंचवड समितीने हे अभियान आ...
छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर
पुणे, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य

छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर

राहुरी, दि.२० (लोकमराठी) - छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला. छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य समितीचे कार्याध्यक्ष श्रीयुत वस्ताद अमित गुंडाकुश यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील फक्त दोनच व्यक्तींना दिला जातो. दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. वाजता मराठी साहित्नय संघ सभागृह नवी मुंबई येथे एका समारंभात निवृत्त ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्या घट...
धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड
पुणे

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड

तळेगाव, दि.१ (लोकमराठी) - धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी निखारे साहेब यांनी ही निवड केली. नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…चेअरमन पदी विनोद टकले, सचिव पदी संजय शिंदे, खजिनदार पदी सुधीर खांबेटे या प्रसंगी धर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२४ कॅलेंडरचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या मावळ तालुका अध्यक्ष सायली बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सायली बोत्रे यांची भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक खंडू टकले यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व आजी माजी संचालक ,पतसंस्थेचे कर्मचारी, दैनंदि...