एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘निर्भय कन्या अभियान’ उपक्रम संपन्न
हडपसर (प्रतिनिधी) : विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 'निर्भय कन्या अभियान' या उपक्रमांतर्गत दोन व्याख्यानांचे व एक दिवसीय कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखा हडपसरच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे उपस्थित होत्या. त्यांनी 'महिला संरक्षण, कायदे व नियम' या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कायद्याने आपल्याला संरक्षण दिले आहे. त्याचा चांगल्या कामासाठी वापर करा. नवीन गोष्टी शिकत राहा. उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघा. अशा स्वरूपाचा संदेश पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी दिला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, येथील कॉमर्स विभागातील प्रा. असावरी शेवाळे मॅडम यांनी 'व्यावसायिक उद्यो...