- ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पुणे शहर जिल्ह्यात १९ लाखांपेक्षा अधिक अर्ज
पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी’साठी पुणे शहर (Pune City) जिल्ह्यातून सुमारे १९ लाख २९ हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १७ लाख ७५ हजारपेक्षा अधिक अर्जाना मान्यता देण्यात आली असून, आधार क्रमांक बँकेशी संलग्न न केल्याने सुमारे तीन लाख २३ हजारपेक्षा अधिक लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही.
लाडकी बहिणीसाठी (Ladaki Bahin) पुणे शहर जिल्ह्यातून जुन्या योजनादूत (YOJANA Doot) अॅपवरून नऊ लाख ७५ हजार सहा अर्ज दाखल करण्यात आले होते. नवीन पोर्टलवरून एकूण नऊ लाख ५४ हजार ४९७ इतके अर्ज दाखल केले होते. त्यामुळे शहर जिल्ह्यातून आजमितीला १९ लाख २९ हजार ५०३ इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १८ लाख ७८ हजार ६५१ इतक्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून चार हजार ७६५ इतके अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत, तर ३१ हजार ३२८ अर्ज अंशतः अपात्र ठरविण्यात आले आहेत. सुमारे १३ हजार इतक्या अर्जाची तपासणी शिल्लक आहे.
जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वातीन लाख लाभाथ्यर्थ्यांनी आधार क्रमांकाशी बँक खाते जोडलेले नाही. राज्यात सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यात असून, त्यापैकी आधार क्रमांक न जोडल्याने लाभापासून वंचित राहणाऱ्यांची जिल्ह्यात सर्वाधिक संख्या आहे. लाभार्थ्यांनी बँकेशी सीडिंग न केल्याने त्यांना लाभ मिळाला नाही. तीन लाख २३ हजार ४१७ महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही. अर्जदारांनी पुढील तीन दिवसांत आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावा, असे आवाहन महिला व बाल कल्याण विभागाने केले आहे. घरोघरी जाऊन महिलांचे अर्ज भरून घेण्याचे अंगणवाडी सेविकांना सूचना करण्यात आल्या आहेत.
अपात्र असून लाभ घेतल्यास माहिती द्या :
लाडकी बहीण योजनेस (Ladki Bahin yojana) अपात्र असूनही अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे अशा बोगस लाभार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे मुळशी तालुक्यातील एका लाभार्थ्याने अजाणतेपणाने अर्ज दाखल करून घेतलेली रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र, जे चौकशीत सापडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अपात्र असलेल्या लाभार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन, महिला व बाल कल्याण विभागाला माहिती कळवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
लाडकी बहीण 66 योजनेसाठी अर्ज करण्याची ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्या मुदतीत लाभार्थ्यांनी अर्ज भरून घ्यावेत; तसेच आधार क्रमांक बँकेशी जोडून घ्यावा; अन्यथा लाभ मिळू शकणार नाही. – (जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी)
हेही वाचा : BIOGAS SCHEME : बायोगॅस संयंत्रासाठी शासन देते ऐवढे अनुदान ; येथे करा अर्ज