पिंपरी : लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.. या म्हणीप्रमाणे नेवाळे वस्ती चिखली (Chikhali) येथे श्री गजानन बाल संस्कार केंद्र प्रत्येक रविवारला घेण्यात येते. केंद्राच्या वतीने घोरदेश्वर येथे बालचमूंसची सहल काढण्यात आली होती. सकाळी साडेसहाला नेवाळे वस्ती येथून घोरदेश्वरला निघाले व सात वाजता डोंगर चढण्यास सुरुवात झाली. सहली मध्ये ४ वर्षाच्या बालपासून ते १२ वर्षाचे बालक सहभागी झाले होते.
सर्वजण प्रथमच डोंगर चढत होते. त्यामुळे डोंगर चढतांना सर्वांना खूपच मजा आली, वरती पोहचल्या नंतर सर्वांनी व्यायाम केला तसेच खेळ सुद्धा झाले नंतर पद्य म्हटले नंतर सर्वांनी घरून आणलेला नाश्ता केला. या साहिलीमुळे मुलामध्ये गड किल्ले बघण्याची ओढ निर्माण झाली. बालवयात अशा प्रकारचे छंद निर्माण होणे, खूप महत्वाचे. या सहलीचे आयोजन मंगेश पाटील यांनी केले होते. या सहलीमध्ये त्यांना श्रीकृष्ण काशीद, चिरतन कुलकर्णी, पंकज दलाल, गुरुराज कुंभार, प्रशांत सिंग, विक्रांत मोजे यांनी मोलाची साथ दिली.