युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान 

पिंपरी, ०२ ऑक्टोबर २०२३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी व राष्ट्रीय स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून काळेवाडी परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांचा युवक काँग्रेसतर्फे सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान, प्रदेश महासचिव प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, आरोग्य निरीक्षक वैभव केंचनगौडा व परिसरातील सफाई कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान पत्र, शॉल व पुष्प देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले होते.