पिंपळे सौदागर : उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ब्रहमचैतन्य आयुर्वेद क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत महाआरोग्य आयुर्वेदीक तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवारी येथे करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात बधिरपणा, हाता पायाला मुंग्या येणे, संधीवात, पोटाचे आजार, मणक्यांचे आजार, दमा, अस्थमा, मुळव्याध, त्वचाविकार, स्त्रियांचे आजार, अम्लपित्त, डोके दुखी, अर्धशिशी (माईग्रेन), सर्दी व खोकला, वारंवार शिंका येणे आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले.
त्याप्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उद्योजक संजय भिसे, डॉ. सुभाषचंद्र पवार, विलास जोशी, अनिल कुलकर्णी, सतिश पिंगळे, विवेकानंद लीगाडे, सुरेश कुंजीर, सागर बिरारी, सुभाष पाटील, रमेश चांडगे, सखाराम ढाकने विष्णुपंत वटंगवार यांच्यासह उन्नति विठाई मोफत वाचनालय व ज्येष्ठ नागरिक संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
याबाबत कुंदा भिसे म्हणाल्या की, ” आयुर्वेद ही भारतातील पुरातन उपचार पद्धती आहे. इतर वैद्यकिय शास्त्रांपेक्षा जास्त, आयुर्वेदाचा जोर रोगांवर उपचारांपेक्षा निरोगी जीवनावर जास्त आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीत साईट इफेक्ट नसतात. या अनुषंगाने फाउंडेशनच्या वतीने या आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन केले होते. “