चिंचवड, ता. ३१ : भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तीन महिन्यांपासून आयोजित केलेल्या वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती आश्विन पौर्णिमेला झाली. ही प्रवचन मालिका प्रबुद्ध संघ चिंचवडगाव येथे राबविण्यात आली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहर महासचिव अशोक सरपाते, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आयुष्यमान एस. एल. वानखेडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास जगताप उपस्थित होते. उल्हास जगताप यांच्या हस्ते १० वी १२ उत्तीर्ण मुलांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी बौद्धांची विश्व विद्यापीठे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध संघाचे सचिव निशांत कांबळे, उपाध्यक्ष अल्पणा गोडबोले, खजिनदार आयुष्यमती अनुराधा सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा वार्ड अध्यक्ष किशन बलखंडे, पदाधिकारी किशोर सोनवणे, डॉ. धर्मेंद्र रामटेके, प्रतिमा साळवी, अशोक कदम व प्रबुद्ध संघाचे सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पणा गोडबोले यांनी केले. तर अनुराधा सोनवणे यांनी आभार मानले. धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.