विवाहितेच्या छळाप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर कौटुंबिक हिंसाचार व अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळाप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर कौटुंबिक हिंसाचार व अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल 
  • कॉंग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे पिडीतीच्या अन्यायला फुटली वाचा

पिंपरी (प्रतिनिधी) – घरखर्चासाठी माहेरवरून पैशाची मागणी, स्त्रीधन असलेले मंगळसुत्र काढून घेतले. बँक खात्यातील दोन लाख काढून घेतले. तसेच तु आमच्या जातीची नाही, तुझे मुल आम्हाला नको, असे म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंद व दिर यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, लुटमार यांच्यासह इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. ही घटना १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान थेरगाव येथे घडली.

याबाबत एका २३ वर्षीय पिडीत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती अशी की, एका मागासवर्गीय तरूणीबरोबर प्रेमाचे नाटक करून तीचा आयुष्यभर सांभाळ करिन असे सांगून आरोपी पतीने एक वर्षापुर्वी तीच्याशी लग्न केले. ते थेरगाव येथे भाड्याने राहू लागले. मात्र, आरोपी पती कामधंदा न करता तीच्या माहेरवरूनच पैशाची मागणी करत होता. पैसे न दिल्यास तीला मारहाण करत असे. तसेच पतीसह तीच्या सासू, नणंद व दिर यांनीही ती त्यांच्या जातीची नसल्याने दिला नांदवण्यास नकार दिला. तसेच तीच्या पोटातील गर्भ खाली करण्यासाठी दबाव आणला. तसेच तीचे मंगळसुत्र काढून घेतले. तीच्या बँक खात्यातील दोन लाख रूपयेही काढून घेतले.

त्यांच्या अत्याचाराला कंटाळून शेवटी ती पिडीता काळेवाडीतील महिला कॉंग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा सायली नढे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती परिवहन विभागाच्या उपाध्यक्षा स्वाती शिंदे, काँग्रेस चिंचवड विधानसभा अध्यक्षा निर्मल खैरे यांच्याकडे मदतीसाठी गेली. नढे दांपत्याने पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन दिले तसेच वाकड पोलीस ठाण्यात घेऊन जात तक्रार दिली. त्यावरून पती, सासू, नणंद व दिराविरोधात गुन्हा दाखल झाला.

Actions

Selected media actions