पिंपरी :“युद्धे, महायुद्धे, घात-अपघात, कोरोना, विविध आजारपणे आणि कितीतरी घटना, दुर्घटना जगाच्या पाठीवर नित्य घडत असतात. त्यावेळी लक्षावधी रुग्णांची सेवासुश्रुषा करावी लागते. त्यावेळी महत्त्वाची गरज भासते ती रक्ताची. रक्ताचा तुटवडा असेल तर वेळ प्रसंगी प्राणही जाऊ शकतो म्हणून पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती रक्तदानाची. रक्तदान हा आजच्या काळातील महायज्ञ आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान आहे.” असे विचार प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी येथे मांडले.
रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी या शिबिराचे उद्घाटन करताना वरील विचार मांडले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजना व N.C.C. व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. N.C.C. कमिटीचे प्रमुख डॉ. प्रसाद बाठे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. मिलिंद भंडारे यांनी मानले. ससून जनरल हॉस्पिटल ब्लड बँक, पुणे यांनी शिबिराचे आयोजन केले. यावेळी महाविद्यालयातील ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी महाविद्यालयातील कला-वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. लक्ष्मण जगदाळे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे, कार्यालय प्रमुख रत्नप्रभा नाईक, नवनाथ शेवाळे, उज्वला तावरे उपस्थित होते.