धक्कादायक ! महिला तहसीलदाराला कार्यालयातच जाळले
हैदराबाद, (लोकमराठी) : तेलंगणमध्ये एका महिला तहसीलदाराला कार्यालयातच भरदिवसा जिवंत जाळण्याची भयानक घटना घडली आले. रंगा रेड्डी जिल्ह्यातील अब्दुलपूरमेट येथील या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजया रेड्डी (वय ३०) असे तहसीलदाराचे नाव असून यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे होरपळून जखमी झाले. हल्लेखोरही होरपळून जखमी झाला आहे.
कुरा सुरेश असे हल्लेखोराचे नाव असून, तो गोवेरेल्लीचा रहिवासी आहे. सोमवारी (दि. 4) दुपारी दीडच्या सुमारास त्याने तहसील कार्यालयात येऊन विजया रेड्डी यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. सुरेश हा शेतकरी असल्याचे कळते. बाचेरान या गावात त्याची सात एकर जमीन असून, ती त्याच्या भावाबरोबर वादात आहे. या संदर्भात न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यातून ही घटना घडल्याचा संशय राचेकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी...