कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात प्रवेश करू नये, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे
डॉ. प्रकाश कोयाडे
गेल्या दोन दिवसांत कोविड संबंधित अचानक बातम्या येऊ लागल्या आहेत. तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा होऊ लागली आहे. कोरोनाबद्दल सोशल मीडिया आणि टीव्ही वरील सुरू झालेल्या चर्चेवरून समज-गैरसमज आणि अफवांचं पीक उठणार आहे. एक भीतीचं वातावरण तयार होऊन येत्या आठवड्याभरात आपण पॅनिक अवस्थेत जाऊ की काय अशी परिस्थिती येण्याच्या मार्गावर आहे.
कोरोनाचा नवीन स्ट्रेन 'Omicron चे दोन रुग्ण बेंगलोरमध्ये सापडले असून ते दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी आहेत. त्यांचे अजून काही रिपोर्ट यायचे बाकी आहेत. नेमके किती म्युटेशन झाले आहे याबद्दल माहिती येणं बाकी आहे. सध्यातरी एकाही भारतीयांमध्ये हा विषाणू सापडला नाही.
या स्ट्रेन बद्दल बरेच तर्क-वितर्क सुरू आहेत. लक्षणं असणार नाहीत, नाक-घशात हा विषाणू प्रकार सापडत नाही डायरेक्ट फुफ्फुसात जातो, शेवटच्या टप्प्यात आल्यानंतरच हा डिटेक्ट होतो वगैरे चर्चा सुरू आहेत. ...