मोठी बातमी

मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई

पिंपरी, (लोकमराठी) : डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत मोशी बो-हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम व्यावसायिकाच्या लेबर कॅम्प परिसरात डेंग्यू सदृश्य आळ्या निदर्शनास आल्याने त्यावर आवश्यक फवारणी करण्यात आली व पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई नुकतीच करण्यात आली. डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत. मंगळवार (दि. १२) रोजी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम. भोसले, आरोग्य निरीक्षक व्ही.के. दवाळे, राजेंद्र उज्जैनवाल, वैभव कांचन गौडार, सचिन जाधव, संपत भोईटे यांच्या पथकामार्फत का...
भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’
मोठी बातमी, राष्ट्रीय

भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीला (भाजप) एका वर्षात तब्बल 700 कोटी रुपयांचा पार्टी फंड मिळाला आहे. ऑनलाईन पेमेंट आणि चेकच्या माध्यमातून सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपला पक्षनिधी म्हणून विविध संस्था आणि व्यक्तींकडून 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी जवळपास निम्मी रक्कम ही टाटाच्या अधिपत्याखालील इलेक्ट्रोल ट्रस्टकडून देण्यात आला आहे. भाजपानेच याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. भाजप हा सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष जगातील सर्वात मोठी पार्टी असल्याचा दावाही भाजपाकडून करण्यात येतो. त्यामुळेच, भाजपला मिळणारा निधीही कोट्यवधी रुपयांचा असतो. सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपाला तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. टाटा उद्योग समुहाशी संलग्नित इलेक्ट्रोल ट्रस्टकडून तब्बल 356 कोटी रुपयांचा निधी भाजपाला देण्यात आला आहे. तसेच, देशातील काही विश्वसनीय संस्थांकडूनही 54.25 कोट...
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू
महाराष्ट्र, मोठी बातमी

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात अँजियोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 ब्लॉक असल्याचं निदान झालं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. “काही दिवसांपूर्वी त्यांच्या काही चाचण्या झाल्या होत्या. तपासण्यांमधून त्यांच्या प्रकृतीत काही बदल झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीत त्यांना ठेवलं जाणार आहे. खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर असलेली जबाबदारी शिवसेनेचे नेते सुनील परब, मिलींद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत संजय राऊत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. जवळपास रोज दोन-तीन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपला जेरीस आणले होते...
राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण
मोठी बातमी, महाराष्ट्र

राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण

मुंबई, (लोकमराठी) : शिवसेनेने मागितलेला अधिक वेळ राज्यपालांनी नाकारल्यानंतर आज रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीला राजभवनावर पाचारण केले. दरम्यान, आम्हाला का बोलावले, नेमके कशासाठी बोलावले आहे, हे माहित नाही. मात्र राज्यपालांचा फोन आल्याने आम्ही राजभवनावर जात आहोत,” असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील त्यानंतर राजभवनाकडे रवाना झाले. राज्यपालांनी शिवसेनेला केवळ २४ तासांची मुदत दिली होती, त्यामध्ये सगळ्या आमदारांच्या सह्या घेणे शक्य नाही. आता आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी बोलावल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले असून आम्ही काँग्रेसशी बोलून निर्णय घेणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेस अजूनही निर्णय घेऊ शकलेली नाही. त्यामुळे आज संध्याकाळी शिवसेनेने राज...
धक्कादायक ! महिला तहसीलदाराला कार्यालयातच जाळले
मोठी बातमी, राष्ट्रीय

धक्कादायक ! महिला तहसीलदाराला कार्यालयातच जाळले

हैदराबाद, (लोकमराठी) : तेलंगणमध्ये एका महिला तहसीलदाराला कार्यालयातच भरदिवसा जिवंत जाळण्याची भयानक घटना घडली आले. रंगा रेड्डी जिल्ह्यातील अब्दुलपूरमेट येथील या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजया रेड्डी (वय ३०) असे तहसीलदाराचे नाव असून यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे होरपळून जखमी झाले. हल्लेखोरही होरपळून जखमी झाला आहे. कुरा सुरेश असे हल्लेखोराचे नाव असून, तो गोवेरेल्लीचा रहिवासी आहे. सोमवारी (दि. 4) दुपारी दीडच्या सुमारास त्याने तहसील कार्यालयात येऊन विजया रेड्डी यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. सुरेश हा शेतकरी असल्याचे कळते. बाचेरान या गावात त्याची सात एकर जमीन असून, ती त्याच्या भावाबरोबर वादात आहे. या संदर्भात न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यातून ही घटना घडल्याचा संशय राचेकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी...
अयोध्येत जमावबंदी आदेश लागू ; मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव
राष्ट्रीय, मोठी बातमी

अयोध्येत जमावबंदी आदेश लागू ; मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव

अयोध्या, (लोकमराठी) : अयोध्या (उत्तर प्रदेश) प्रकरणाची सुनावणी पुर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागू शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात पोलिसांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन जनतेला केले आहे. अयोध्या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत याविषयी निकाल अपेक्षित असल्यामुळे उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र सरकारने हा संवेदनशील विषय हाताळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे आता शहर परिसरात नागिरकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. तसेच कोणत्याही विषयावर मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अंजू झा यांनी 31 ऑक्टोबर रोजी या संदर्भात आदेश दिले आह...
औरंगाबादमध्ये संपत्ती, बाई, दारूमुळे 215 खून
मोठी बातमी, महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये संपत्ती, बाई, दारूमुळे 215 खून

औरंगाबाद (लोकमराठी) : मागील पाच वर्षांत औरंगाबाद शहरात तब्बल 215 खुन झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात आठ खून झाले असून, यातले बहुतांश खून मद्यपानामुळे झाले आहेत. अशा घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण परले आहे. शहरात गाजलेले मानसी देशपांडे, श्रुती कुलकर्णी खून प्रकरण असो की, अलीकडे सातारा परिसर, उल्कानगरीत झालेला हायप्रोफाईल खून अथवा सप्टेंबर महिन्यात चौधरी कॉलनीत झालेले तिहेरी हत्याकांड या व अशा कित्येक घटनांनी औरंगाबादकरांच्या मनात भय उत्पन्न होत आहे. शहरात खुनाच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून, ही बाब चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल 2019 या चार महिन्यांत बारा खून झाले. ही सरासरी असतानाच सप्टेबर महिन्यातच तब्बल आठ खून झाले. वर्चस्ववाद, गुंडगिरी, कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार, प्रेमप्रकरण, जमीन व्यवहार आदी कारणांमुळे खून होत असल्य...
घड्याळाचे बटन दाबले तरी मतदान कमळाला 
महाराष्ट्र, मोठी बातमी

घड्याळाचे बटन दाबले तरी मतदान कमळाला

मशिनमध्ये बिघाड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी केले मान्य सातारा (लोकमराठी) : सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी (ता. खटाव) येथील मतदान केंद्रावर कोणतेही ईव्हीएम मशिनचे कोणतेही बटन दाबले दाखल तरी मतदान कमळाला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. त्यामुळे तेथे नवीन मशिनवर पुढील मतदान घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पवार हे मतदान करण्यासाठी गेले असता अधिकाऱ्याने त्यांना बॅलेट दिला; परंतु मतदान करण्यापूर्वी कमळाच्या चिन्हापुढील लाईट लागून मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. असाच प्रकार आम्ही मतदान करतेवेळी झाल्याचे रोहिणी दीपक पवार, आनंदा ज्ञानेश्‍वर पवार, माजी उपसरपंच सयाजी श्रीरंग निकम, प्रल्हाद दगडू जाधव, दिलीप आनंदा वाघ यांनी निवडणूक अधिकाऱ्यास सांगितले. घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबले, तरी मतदान कमळास होत असल्याची बाब ग्रामस्थांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्...
भिंतीवरील थुंकी पुसणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्याने आता स्वत:लाच पाच हजाराचा दंड ठोठावला
महाराष्ट्र, मोठी बातमी

भिंतीवरील थुंकी पुसणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्याने आता स्वत:लाच पाच हजाराचा दंड ठोठावला

बीड (लोकमराठी) : कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि सध्याचे बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी स्वत:लाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पांडे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांना चहा देण्यात आला. मात्र, चहा प्लास्टिक मिश्रित कपात देण्यात आल्याची तक्रार एका पत्रकाराने केली. यावेळी कारवाईचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी स्वतःलाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. निवडणुकीत प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे. महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी संदर्भात कडक नियम करण्यात आले आहेत. मात्र याची पायमल्ली होत असतानाच, बीडच्या जिल्हाधिकाऱ्याने स्वतःलाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने चर्चेचा विषय बनला आहे. अकोल्यात भिंतीवरील थुंकी स...
अवैधरित्या मद्यपुरवठा प्रकरणी येथे तक्रार करा; मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द
महाराष्ट्र, मोठी बातमी

अवैधरित्या मद्यपुरवठा प्रकरणी येथे तक्रार करा; मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांची माहिती मुंबई (लोकमराठी) : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्‍ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स ...