सिटिझन जर्नालिस्ट

चिंचवडगावात भीम जयंती उत्साहात साजरी
सिटिझन जर्नालिस्ट

चिंचवडगावात भीम जयंती उत्साहात साजरी

चिंचवडगाव : प्रबुद्ध संघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चिंचवडगाव महोत्सवामध्ये १३ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध चौक येथे आतीशबाजी करण्यात आली. १४ एप्रिलला सकाळी पंचशील झेंडा फडकविण्यात आल्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेत १७ एप्रिलला भिम गितांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चिंचवडगाव येथील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व प्रबुद्ध संघाचे बहुतांश सभासद उपस्थित होते. कार्यक्रमात प्रस्तावना किशन बलखंडे (सचिव प्रबुद्ध संघ) यांनी केली, तर मार्गदर्शन अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी केले. भिम महोत्सवात भिम गितांचा बहारदार कार्यक्रमात प्रबोधनपर गाणी झाली. कार्यक्रम झाल्यानंतर प्रबुद्ध संघाच्या वतीने भोजन देण्यात आले. ...
तुकाराम बीज……विचार तरंग
सिटिझन जर्नालिस्ट

तुकाराम बीज……विचार तरंग

तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम || धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ || आज तुकाराम बीज म्हणजे आजच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी आपला देह पंच महाभूतांना देऊन टाकला आणि आपला इहलोकातील जीवन प्रवास थांबवला, तो आजचा दिवस. कित्येक जीव जन्म घेतात आणि मरतात, परंतु संत तुकाराम महाराज यांनी जो पुरुषार्थ केला तो जगाला वळण देणारा आहे. जोपर्यंत मनुष्य जमात येथे निवास करणार आहे, तोपर्यंत संत तुकोबा आपल्या अभंगातून आपल्याला जीवनाचे मार्गदर्शन करत राहणार आहेत. संत तुकाराम महाराज यांचे संपूर्ण जीवन तसेच त्यांनी लिहिलेले अभंग हे आपल्याला सुखी समृद्ध जीवनाकडे घेऊन जाणारा आहे. आज आपण हा उत्सव साजरा करताना त्यांच्या विचारातून आपलें जीवन आनंदी, पुरुषार्थी, कसे बनेल याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण दिवस येतात आणि जातात मनुष्य हा दुःखी जीवनाकडे वाटचाल करत राहतो. मानवी जीवनात दुःख निर्माण करणा...
न्यायालयावर पक्षपातीपणाचा डाग का लागतोय ?
सिटिझन जर्नालिस्ट

न्यायालयावर पक्षपातीपणाचा डाग का लागतोय ?

अरुण पां. खटावकर महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेल्यानंतर पिसाळलेल्या भाजप नेत्यानी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याची जुनी प्रकरणे बाहेर काढून केंद्रातील ईडी,सीबीआय ,आयकर विभाग यांना हाताशी धरून सरकारला बदनाम करण्याचा विडा उचललेला दिसतोय.त्याला आता राज्यपालांचीही साथ मिळत आहे पण ज्या न्यायालयावर जनतेचा नव्हे तर सर्वाचाच विश्वास होता ते सुद्धा आता भाजपची साथ देतात की काय अशीही शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्याची उदाहरणे खालीलप्रमाणे१. एका मराठी आर्किटेक्टच्या आत्महत्येपूर्व चिट्ठीत रिपब्लिकन टीव्हीचा सर्वेसर्वा आणि भाजपचा चाहता अर्णब गोस्वामी याचे नाव असूनही कोर्टाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. २.चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधून समाजात भाजपच्या सहाय्याने राजकारण करत असतानाही तिच्यावर केंद्राच्या मदतीने कोणतीही कारवाई होत नाही. ३.भाजप नेते किरीट...
पिंपरी भाजी मंडईमध्ये शिवजयंती साजरी
सिटिझन जर्नालिस्ट

पिंपरी भाजी मंडईमध्ये शिवजयंती साजरी

पिंपरी : टपरी, पथारी, हातगाडी पंचायत व सावित्रीबाई फुले भाजी विक्री संघ संयुक्त समिती यांच्या वतीने पिंपरी रेल्वे स्टेशन लगत भाजी मंडईमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी रमेश शिंदे, संतोष वडमारे, नजीर मुलानी, गौतम रोकडे, अस्लम मणियार, प्रवीण वडमारे, फिरोज तांबोळी, भाऊसाहेब अभंग व समितीचे सर्व सदस्य व सभासद उपस्थित होते. ...
शरदनगरमध्ये पार पडले बालांचे संचलन
सिटिझन जर्नालिस्ट

शरदनगरमध्ये पार पडले बालांचे संचलन

चिंचवड : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिखली येथील शरद नगर येथे लहान मुलांचे संचलन पार पडले. संध्याकाळी हनुमान मंदिरापासून सुरुवात झाली व संचलन समृद्धी पार्क मध्ये समाप्त झाले. या संचलनमध्ये परिसरातील लहान मुलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती. तसेच आपआपल्या दारी रांगोळी काढल्या होत्या व संचालनाचे स्वागत केले. सुरुवातीला वंदे मातरम गीताने सुरुवात झाली. नंतर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. शेवटी बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली....
काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात प्रजासत्ताक दिन साजरा
सिटिझन जर्नालिस्ट

काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात प्रजासत्ताक दिन साजरा

काळेवाडी : प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात झेंडा वंदन करण्यात आले. त्यावेळी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. त्याप्रसंगी भागवत बाबा महाराज, श्रीकांत कुलकर्णी, बलबहादुर दमाई, अंबुकला दमाई, अशोक झा, रिंकू झा, पूरन दमाई, मीरा बिरादर, धनेश्वर दमाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ...
निगडी प्राधिकरणात रंगली शानदार काव्यकट्टा मैफिल
सिटिझन जर्नालिस्ट

निगडी प्राधिकरणात रंगली शानदार काव्यकट्टा मैफिल

आत्माराम गोविंदराव हारे, पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड : निगडी येथील सावरकर सदन येथे नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या वतीने साहित्य आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे ९० टक्के सहभाग ज्येष्ठांचा होता, हे मला आवर्जून नमूद करताना आनंद वाटला. कारण, कोरोनामुळे प्रचंड ताणतणाव होता. तो या साहित्य संमेलनातून पुर्णपणे नाहीसा झाला. ज्येष्ठांच्या विविध कलागुणांचे दर्शन झाले. वय झालं असलं तरी उत्साह तरुणाईला लाजवणारा दिसून आला. कविता म्हणजे एका विचारांने दुसऱ्या विचारांशी साधलेला संवाद आहे. प्रत्येक शब्द मानवतेचा आरसा असतो, याला तडा जाऊ नये, म्हणून कवी आपले विचार मांडत राहातो. हेच खरे वैशिष्ट्ये या काव्य मैफिलीतून दिसून आले. जगण्यातले बारकावे टिपणारा कवी समाजात सुख शांती निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रत्येक कवींच्या कवितांतून आढळून आले. येऊ देत संकटांनी वाटेत अमुच्या आम्ही घ...
दिघीतील दत्त काॅलनीत दत्तजयंती उत्साहात साजरी
सिटिझन जर्नालिस्ट

दिघीतील दत्त काॅलनीत दत्तजयंती उत्साहात साजरी

दिघी : येथील दत्त काॅलनीमध्ये दत्त मंदिरात भजन, किर्तनाचा गजर दत्तजंयती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविक दत्तनामाच्या जयघोषात न्हाऊन निघाले. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन दिघीचा आदिवासी वाघ संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी अध्यक्ष वसंत रेंगडे, नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी नगरसेविका आशा सुपे, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप पंराडे, संजय गायकवाड, ज्ञानेश आल्हाट, सचिन दुबळे, कमलाकर मुंढे, रवि पोहरे, हरीभाऊ लबडे, रमेश विरणक, संजय बांबळे, प्रविण बांबळे बबन पारधी, अॅड कुणाल तापकीर, ज्योती तापकीर, सागर तापकीर, किशोर ववले, महेश झपके, अमोल देवकर, हरीभाऊ लबडे, धनाजी खाडे, प्रतीक शिरसाठ, बाळासाहेब सुपे आदी उपस्थित होते....
माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर गुन्हेगारी मार्गही आधुनिक
सिटिझन जर्नालिस्ट

माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर गुन्हेगारी मार्गही आधुनिक

ज्योत्स्ना राणे भारत देशात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांचा आलेखहि वाढत आहे़. या आधुनिक जगात माहिती व तंत्रज्ञानाचा विकास फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने गुन्हे करण्याचे मार्ग सुध्दा आधुनिक झाले आहेत. जागतिकीकरणानंतर देशात सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर वाढल्यामुळे व दैनदिन कामे सोपे, जलदगतीने होण्यासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यामुळे फायदा झाला असला, तरी काही लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत. संगणकाच्या एका कीबोर्डवर सर्व व्यवहार आले आहेत. त्याबरोबर गुन्हेगारांना सुध्दा नवीन क्षेत्र उपलब्ध झाले आहे. पारंपारिक पध्दतीचे गुन्हे करुन आपले इप्सित साध्य करणारे गुन्हेगार, आता संगणकाच्या माध्यमातुन सायबर स्पेसमध्ये इलेक्ट्रॉनिक व संगणकीय वातावरणात आता गुन्हे करायला लागले आहेत. संगणकीय क्षेत्रामध्ये केलेल्या अपराध्यांना किंवा गुन्हेगारांना सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम असे ...
बाभळीच्या झाडांचे संवर्धन का करावे?
सिटिझन जर्नालिस्ट

बाभळीच्या झाडांचे संवर्धन का करावे?

बाभळीचे झाड लावताना अनेक जण विचारतात, तूम्ही काटेरी झाड कसे काय लावता? आम्ही उत्तर तरी देणार काय? आमचे शिक्षण जेमतेम दहावी. आठवड्यातल्या सात दिवसापैकी चार दिवस जंगलातच असायचो. तीन दिवस शाळेत दोन दिवस मार खाण्यातच जायचो. पण निसर्गाने आम्हाला खूप काही शिकवले. माणसाने बाभळीचे झाड पाडुन गुलाबाची शेती केली आणि कोटींच्या कोटी ऊडडाने घेतली. काटे तर गुलाबाला पण असतात. जसे एखादया स्त्रीला आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी माहेर सुरक्षित वाटते. तसेच अनेक जिवांना आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी हे बाभळीचे झाड सुरक्षित वाटते. जणु काही त्यांचे प्रसुतीगृहच पण माणसाने त्यावर कुराड चालवली आणि निसर्गाचा समतोल ढासळला....

Actions

Selected media actions