ताज्या घडामोडी

PCMC|निगडीत रविवारी रोटरी सायक्लोथॉनचे आयोजन
ताज्या घडामोडी

PCMC|निगडीत रविवारी रोटरी सायक्लोथॉनचे आयोजन

पिंपरी : रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने महिला सुरक्षा जनजागृती साठी रोटरी सायक्लोथॉनचे रविवारी (दि. २) आयोजन केले आहे. निगडी येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे सकाळी ५ वा सायक्लोथॉन होणार आहे. या वेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिश्नोई यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. ५० किमी, २५ किमी, १० किमी असे गटात सायकल पट्टू धावणार आहे. या सायक्लोथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजक अध्यक्ष कृष्णा सिंघल, सचिव संतोष गिरंजे यांनी केले आहे....
खुशखबर ! पेट्रोल-डिझेलच्या दरात कमालीची घट, जाणून घ्या आजचे दर
ताज्या घडामोडी

खुशखबर ! पेट्रोल-डिझेलच्या दरात कमालीची घट, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : लोकमराठी – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून येत आहे. देशात लागोपाठ पेट्रोल-डीझेलचे दर घटत आहेत. मंगळवारीसुद्धा पेट्रोल आणि डीझेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोलच्या दरात 11-12 पैसे कपात केली. तर डीझेल 13-14 पैसे प्रती लीटर स्वस्त झाले आहे. या कपातीनंतर दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 73.60 रुपये मोजावे लागतील. तर एक लीटर डीझेलसाठी 66.58 रुपये खर्च करावे लागतील. चार महानगरांमध्ये पेट्रोल-डीझेलचे दर इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर अनुक्रमे 73.60 रुपये, 79.21 रुपये, 76.22 रुपये आणि 76.44 रुपये प्रती लीटर आहेत. तर चार महानगरांमध्ये डीझेलचे दर अनुक्रमे 66.58 रुपये, 69.79 रुपये, 68.94 रुपये आणि 70.33 रुपये प्रती लीटर किमतीने मिळत आहे. ...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (वृत्तसंस्था) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा मित्र व सहकारी एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेली अनेक वर्ष पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सापळा रचून मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला पाटणा विमानतळावरून अटक केली. न्यायालयाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 2003 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एजाजचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, तसे नसून तो वेश व देश बदलून राहात होता. गेले काही दिवस तो कॅनडामध्ये राहात होता. त्याच्याविरूद्ध मुंबई, दिल्ली व महत्त्वाच्या शहरांमध्ये हत्या, खंडणी व या सारखे अनेक प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. https://twitter.com/ANI/status/1215180050418421760 यापूर्वी एजाजच्या मुलीला अटक करण्यात आली होती. खोटा पासपोर्ट बनवून पळून जायच्या बेतात असलेल्या त्याच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले, ...
लोकनेते गोपिनाथ मुंडे यांना पुण्यात अभिवादन
ताज्या घडामोडी

लोकनेते गोपिनाथ मुंडे यांना पुण्यात अभिवादन

पुणे, (लोकमराठी) : आमदार धनंजय मुंडे यांच्या पुणे येथील जनसंपर्क कार्यालयात लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी श्री कराड, विजय वडमारे, वजृजित हांगे, ‌ज्ञानेश्वर बडे, सचिन बडे, अक्षय मुंडे, राहुल दहिफळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे : तटकरे
ताज्या घडामोडी, राजकारण

राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे : तटकरे

नवी दिल्ली (लोकमराठी) : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली असून, सकारात्मक निर्णय होत आहेत. राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा दोनच जागा कमी असून, अडीच वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी इच्छा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शुक्रवार) शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. आजही दिल्लीत बैठकांचे सत्र सुरुच असून, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. तटकरे म्हणाले, "की राज्याची मुख्यमंत्री महिला व्हावी, अशी काही चर्चा झालेली नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची चर्चा अजून झालेली नाही. शिवसेनेपे...
पत्रकार निशा पाटील – पिसे यांची आत्महत्या
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

पत्रकार निशा पाटील – पिसे यांची आत्महत्या

पिंपरी ( लोकमराठी ) :- पिंपरी- चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा आणि दैनिक प्रभातच्या ज्येष्ठ पत्रकार निशा पाटील-पिसे यांनी गुरूवारी (ता. ३१) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू व अभ्यासू पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जात. दैनिक केसरीतून त्यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीस सुरूवात केली होती. ‘लोकसत्ता’च्या ‘पिंपरी-चिंचवड अंतरंग’ पुरवणीसाठी त्या नियमित लेखन करायच्या. ‘एमपीसी न्यूज’मध्ये त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. ‘एमपीसी न्यूज’च्या मुख्य वार्ताहर पदाची धुराही त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. पुढे ‘पीसीबी टुडे’च्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शेवटी दैनिक ‘प्रभात’मध्ये उपसंपादक म्हणून त्या कार्यरत होत्या. काल रात्री पावणेनऊ वाजता त्या कार्यालयातून घरी गेल्या. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी खोलीचा दरवाजा आत...
ताज्या घडामोडी

मावळ मध्ये ७१.२७ टक्के मतदान

पिंपरी (लोकमराठी) : मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 71.27 टक्के मतदान झाले. मागील विधानसभा निवडणुकीतही मतदानाची एकूण टक्केवारी 71. 2 टक्के होती. मावळामधील एकूण 3,48,462 मतदारांपैकी 2,48,349 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासांत मावळात 6.74 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सकाळी ११ वाजेपर्यंत ही आकडेवारी 18.33 टक्क्यांवर पोचलेली दिसून आली. दुपारी १ वाजेपर्यंत १ लाख २३ हजार १४३(३५.३४ टक्के) मतदारांनी मतदान केले. दुपारी ३ वाजेपर्यंत ५३.६० टक्के मतदारांनी मतदान केले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 64.36 टक्के मतदारांनी मतदान केले. त्यात 1,17,945 पुरुष तर 1,06,315 महिला मतदारांचा समावेश आहे. मावळात एकूण मतदान 3 लाख 48 हजार 462 आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत मावळ मतदारसंघात 65 हजार 631 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 40 हजार 591 पुरुष, 25 हजार 039 महिला व एका तृतीयपंथी व्यक्तीच...
ताज्या घडामोडी

मावळ मध्ये ७१.२७ टक्के मतदान

पिंपरी (लोकमराठी) : मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 71.27 टक्के मतदान झाले. मागील विधानसभा निवडणुकीतही मतदानाची एकूण टक्केवारी 71. 2 टक्के होती. मावळामधील एकूण 3,48,462 मतदारांपैकी 2,48,349 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासांत मावळात 6.74 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सकाळी ११ वाजेपर्यंत ही आकडेवारी 18.33 टक्क्यांवर पोचलेली दिसून आली. दुपारी १ वाजेपर्यंत १ लाख २३ हजार १४३(३५.३४ टक्के) मतदारांनी मतदान केले. दुपारी ३ वाजेपर्यंत ५३.६० टक्के मतदारांनी मतदान केले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 64.36 टक्के मतदारांनी मतदान केले. त्यात 1,17,945 पुरुष तर 1,06,315 महिला मतदारांचा समावेश आहे. मावळात एकूण मतदान 3 लाख 48 हजार 462 आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत मावळ मतदारसंघात 65 हजार 631 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 40 हजार 591 पुरुष, 25 हजार 039 महिला व एका तृतीयपंथी व्यक्तीच...
ताज्या घडामोडी

मार्केटिंग फंडा

पिंपरी (लोकमराठी ) : महिलांनो, नवरात्रीतले नऊ रंग धार्मिक नाहीत, हा तर होता मार्केटिंग करण्याचा फंडा!! तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून? किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून? हो, आम्हाला पडला हा प्रश्न आणि आम्ही त्याचं उत्तरही शोधून काढलं. गंमत म्हणजे आमच्या उत्तराला क्विंटचं अनुमोदनही मिळालं.उत्तर आणि त्यामागची कथा मोठी रंजक आहे हो. वाचाच मग आता.. तर, आठवणीप्रमाणे साधारण २००३च्या सुमारास आपल्या महाराष्ट्र टाईम्सने श्रावणक्वीन आणि नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन. मग काय, बँका, शाळा , ऑफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवणी...
कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचं निधन
ताज्या घडामोडी, मनोरंजन

कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचं निधन

मुंबई (लोकमराठी) - ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि नाटककार किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी मुंबईतील बॉम्बे रग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरकर यांचं मराठी आणि इंग्रजीमध्ये मोठं लेखन आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. सात सक्कम त्रेचाळीसह या कांदबरीसह त्यांच्या अनेक नामवंत साहित्याच साहित्य क्षेत्रासाठी मोठं योगदान आहे. सन 2001 मध्ये इंग्रजी साहित्य अकादमीचा पुरस्कारही नगरकर यांना मिळाला होता. किरण यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया पत्रकार अस्मिता मोहिते यांनी दिली आहे. दरम्यान, मेंदूत रक्तश्राव झाल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला....