जोश्यांनीं कधी हातात नांगर धरलाय का?
कामिल पारखे
ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात हे एक अत्यंत गाजलेले विधान. त्याकाळच्या राजकीय स्थितीची माहिती नसणाऱ्या आजच्या नव्या पिढीलाही विधान हे करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे हे अंदाजाने कळू शकते. या
विधानाला देशातील जातिव्यवस्थेचा आणि चातुर्वर्णाचाही संदर्भ आहेच.
अलिकडच्या काळात म्हणजे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार संभाजीराजे यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर नेमणूक केली तेव्हा पूर्वीच्या काळात छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत, आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करतात अशा आशयाचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्या विधानालासुद्धा असाच जातिव्यवस्थेचा संदर्भ होता.
'जोश्यांनीं कधी हातात नांगर धरलाय का?’ हे विधान १९८०च्या दशकाच्या सुरु...