विशेष लेख

जोश्यांनीं कधी हातात नांगर धरलाय का?
विशेष लेख

जोश्यांनीं कधी हातात नांगर धरलाय का?

कामिल पारखे ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात हे एक अत्यंत गाजलेले विधान. त्याकाळच्या राजकीय स्थितीची माहिती नसणाऱ्या आजच्या नव्या पिढीलाही विधान हे करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे हे अंदाजाने कळू शकते. या विधानाला देशातील जातिव्यवस्थेचा आणि चातुर्वर्णाचाही संदर्भ आहेच. अलिकडच्या काळात म्हणजे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार संभाजीराजे यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर नेमणूक केली तेव्हा पूर्वीच्या काळात छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत, आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करतात अशा आशयाचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्या विधानालासुद्धा असाच जातिव्यवस्थेचा संदर्भ होता. 'जोश्यांनीं कधी हातात नांगर धरलाय का?’ हे विधान १९८०च्या दशकाच्या सुरु...
१५ वर्षांपुर्वी घरातून निघून गेलेल्या सासऱ्यास सुनेच पत्र
विशेष लेख

१५ वर्षांपुर्वी घरातून निघून गेलेल्या सासऱ्यास सुनेच पत्र

आदरणीय आप्पा , आज रोजी आपणास घरातून निघून जाऊन १५ वर्षे पूर्ण झाली. आपण कशा अवस्थेत असाल हे परमेश्वरच जाणे. या वर्षात आपल्या आठवणीशिवाय एक दिवसही गेला नसेल.माणूस अवती भवती असताना त्याची किंमत कुणालाच कळत नसते, तो गेल्यावर रान सैरभैर होते. किती प्रयत्न केला सुधारणा कराव्याशा वाटल्या तरी काहीच उपयोग नसतो हे खरेच. आज जबाबदारी पेलताना दमछाक होताना तुमच्या होत असलेल्या ओढातानीची जाणीव होते. या कुटुंबात मला सामील करण्यात तुमचाच पुढाकार होता. मला कायम तुम्ही सूनेऐवजी मुलगीच मानलीत, मुलगी मानन अन् प्रत्यक्षात वागणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो. या घराच्या चाली रिती तुमच्यामुळेच मला कळाल्या, सगळ्यानच्या म्हणन्या प्रमाणे होतेच मी तुमची लाडकी. पैसा हा जगण्यास आवश्यक असतो. असेल तर अडचण अन् नसेल तरी अडचण.. तुम्ही आयुष्यभर सायकलवर फिरून कमावलेलं वैभवाचा ...
नव्या पिढीची जबाबदारी…
विशेष लेख

नव्या पिढीची जबाबदारी…

चंद्रकांत झटाले आजची पिढी मग ती सुशिक्षित असो की अशिक्षित ती कोणत्याही विषयावर प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे. त्यांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि कानांनी ऐकू येणाऱ्या परिस्थितीवर विश्वास न ठेवता, मीडिया किंवा राजकीय नेते-पक्ष काय सांगतात त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. ही पिढी अचानक भरकटली की पद्धतशीरपणे भरकटविली गेली? या पिढीची जबाबदारी काय? या सर्वांवर चिंतन झालं पाहिजे. या देशातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. फक्त त्या उर्जेला योग्य दिशा देण्याची गरज आहे. ही दिशा देतांना त्यांना त्यांच्याच पद्धतीने सांगितले जाणे गरजेचे आहे. ज्यांच्या हातात उद्या आपला देश जाणार आहे ती नवीन युवा पिढी आजच्या परिस्थितीत अनेक विषयांबाबत गोंधळलेली दिसते. काय खरं? काय खोटं? हे पडताळून पाहण्यात कमी पडते आहे. आजच्या पिढीचे आदर्श देख...
लाईक अँड शेअरचा आर्थिक डोलारा | भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्न सर्वकाही सिंगल क्लिकवर
विशेष लेख

लाईक अँड शेअरचा आर्थिक डोलारा | भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्न सर्वकाही सिंगल क्लिकवर

रोहित आठवले फेसबुक-इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईगिरी करणारी दोन प्रकरण नुकतीच पुढे आली. तर याच माध्यमातून कॉलेजिअन्संना रस्त्यावर उतरविणारा भाऊही नावाजला गेला. परंतु, या सगळ्यांच्या पोस्टला होणारा लाईक अँड शेअरचा दररोजचा आर्थिक डोलारा हा काही लाखात असून, या माध्यमावर सुरू असलेले भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्नकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. स्थानिक #पोलिस, राज्य पोलिस, #एटीएस, #नर्कोटिक कंट्रोल ब्यूरो यासह देशातील विविध तपास आणि गुप्तचर यंत्रणांची स्वतंत्रपणे सोशल मीडियाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी टीम असते. पण यातील एकाही यंत्रणेला महाराष्ट्रात एकाच वेळेस विविध ठिकाणी कॉलेजिअन्स् रस्त्यावर उतरणार असल्याचे समजले नव्हते. तसेच सोशल मीडियावरून पर्सनल ॲप्लीकेशन डाउनलोड करायला सांगून त्याद्वारे सुरू असलेला सॉफ्ट पॉर्नचा धंदा आणि त्यातून चालणारी आर्थिक उलाढाल अद्याप ...
एक उत्कृष्ट न्यूज फोटोग्राफर माजेद खान यांचे निधन
महाराष्ट्र, विशेष लेख

एक उत्कृष्ट न्यूज फोटोग्राफर माजेद खान यांचे निधन

द महेश एक उत्कृष्ट न्यूज फोटोग्राफर, एक उत्तम, मनमिळावू, लाघवी मित्र, निर्मळ मनाचा माणूस. ३० वर्षांच्या पत्रकारितेत सातत्याने त्याचा संबंध होता. मैत्री होती. न्यूज फोटोग्राफी करताना कलात्मक फोटोग्राफीची आवड तो जोपासत राहिला. त्याला असाईनमेंट दिली की उत्तम फोटो येणारच हे पक्कं असायचं. 'सामना'मध्ये असताना योगेश लोंढे मोठ्या सुट्टीवर असताना माजेद १५ दिवस त्याच्या ऐवजी असाईनमेंट करे. विलासराव मुख्यमंत्री असताना वाल्मी मध्ये दुष्काळाबद्दल बैठक लावली होती. त्याच्या आधी द्यायच्या दणदणीत बातमीसाठी तसाच दणदणीत फोटो हवा होता. आपल्या खळखळ वाजणाऱ्या कायनेटिक होंडा वरून तो पार खुलताबादजवळच्या कागजीपुऱ्याच्या कोरड्याठाक तलावाचा फोटो घेऊनच आला. अनेक वार्ताहरांच्या ठीक ठाक बातम्या त्याच्या फोटोमुळे हिट ठरल्या अशी अनेक उदाहरणे आता डोळ्यासमोर येतायत. नोकरीसाठी न्यूज फोटो काढताना तो कला...
थोडक्यात सांगायचे म्हणजे – डॉ सचिन लांडगे
विशेष लेख

थोडक्यात सांगायचे म्हणजे – डॉ सचिन लांडगे

धर्म आणि धर्मग्रंथांनी पूर्वीच्या काळी खूप महत्वाचे काम बजावले आहे.. समाजव्यवस्था कशी असावी? दुसऱ्याला त्रास न होता कसे वागावे? न्यायनिवडा कसा करावा? नीतीने वागणे म्हणजे काय? खरं खोटं म्हणजे काय? चांगलं वाईट कसं ठरवायचं? असे नैतिक प्रश्न त्याकाळी धर्म सोडवत असे… तेंव्हाच्या उपलब्धतेनुसार आणि निसर्गानुसार पेहराव कसा असावा, स्त्री-पुरुषांनी काय घालावे, याचेही नियम धर्मच बनवत होता. पूर्वीचे वैद्यकशास्त्र आता ईतके प्रगत नव्हते म्हणून आजार होऊ नयेत यासाठी कोणत्या मोसमात काय खावे काय प्यावे याचेही मार्गदर्शन धर्मच करत असे.. वाळवंटात पाणी जपून वापरावे लागते म्हणून फक्त आठवड्यातून एकदा अंघोळ, वाळूच्या वादळकणांपासून संरक्षण म्हणून चेहरा अन डोके झाकून घेण्याची पध्दत, अशा छोट्या छोट्या गोष्टीत देखील धर्मच मार्गदर्शन करत होता. पूर्वी सतत होत असलेल्या युद्धांमध्ये खूप मोठ्या प्रमाण...
अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात |कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये
मोठी बातमी, विशेष लेख

अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात |कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये

रोहित आठवले युवकाचा अपघात होतो.. शस्त्रक्रिया करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले गेल्याने पोटच्या गोळ्याला पुन्हा उभे करण्यासाठी आईची धडपड सुरू होते. परंतु, आपल्या जखमी मुलाला ओरबडण्यास "वायसीएम"ची श्वापदसज्ज असल्याचे पाहून ती माऊली पुरती हादरून जाते. डॉक्टरांनी सांगितलेली सामुग्री ठराविक कंपनी (ठेकेदार) कडून खरेदी केली नसल्याने तुमच्या मुलाची शस्त्रक्रिया अयशस्वी होईल अशी भीती दाखवून वस्तूरुपी (इंप्लांट) खंडणी उकळली जाते. मात्र, जुनी प्रकरण उकरून गुन्हे दाखल करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना या घटनेची महिन्यानंतर साधी कल्पना सुद्धा नाही. शहरात गेल्या महिन्याभरात हा सगळा घटनाक्रम घडला आहे. परंतु, आपल्या मुलाबाळांना निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून धडपडणाऱ्या स्थानिक धेंडांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास वेळ झालेला नाही. तर दुसरीकडे दर शुक्रवारी पुण्यात जाऊन दादांच्या पाया पडणाऱ्...
नथुराम आणि गांधीजी
विशेष लेख

नथुराम आणि गांधीजी

कामिल पारखे पणजी येथे धेम्पे कॉलेजात माझे पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले आणि माझा मुख्य विषय होता तत्त्वज्ञान. त्यात एक वर्षी फिलॉसॉफी ऑफ रिलीजन म्हणजे चक्क 'विविध धर्मांचे तत्त्वज्ञान" हा एक विषय होता. श्रीरामपूरला दहावीपर्यंत मराठी भाषेत शिकून येसुसंघिय किंवा जेसुईट फादर होण्यासाठी सत्तरच्या दशकात मी गोव्यात आलो होतो. कौटुंबिक पार्श्वभूमी काथोलिक धार्मिक अशी होती नाही तर जीवनभर संन्याशी धर्मगुरु होण्याचा कुणी विचारही केला नसता. तत्त्वज्ञान हा विषय घेण्याचे एक कारण म्हणजे धर्मगुरु होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तत्वज्ञान आणि ईशज्ञान ( थिऑलोजी ) या विषयांचा अभ्यास करावा लागतोच, नाहीतर फॉर्मेशन टप्प्यालाच गच्छंती होते. धर्मगुरु होण्यासाठी किमान तेव्हढी बौद्धिक पातळी आवश्यक आहे असे जेसुईट संस्था मानते. तर या कॉलेज जीवनात त...
सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?
मोठी बातमी, विशेष लेख

सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?

डॉ. विश्वंभर चौधरी १. पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर सुभाषबाबूंनी स्वतःच्याच कार्यकारिणीवर टीका केली. 'काॅग्रेसची कार्यकारिणी इंग्रजधार्जिणी आहे' अशी टीका खुद्द काॅग्रेस अध्यक्षच करू लागल्यानं मोठी विचित्र स्थिती निर्माण झाली. कार्यकारिणीवर विश्वास नसेल तर सुभाषबाबूंनी आपल्या मनाप्रमाणे स्वतंत्र कार्यकारिणी निवडावी अशी रास्त सूचना गांधीजींनी केली. याचा अर्थ सुभाषबाबूंनी 'असहकार' असा घेतला. वस्तुतः तो स्वयंनिर्णयाचा अधिकार होता. २. जो शब्द नेहरू विरोधकांना अजिबात आवडत नाही, 'समाजवाद' त्याच शब्दांनी सुभाषबाबू -नेहरू जोडले गेले होते. काॅग्रेसमध्ये बराच काळ सुभाषबाबू-नेहरू एक गट आणि मोतीलाल नेहरू, सरदार पटेल- गांधी असा दुसरा गट होता. आता इथं हिंदुत्ववाद्यांना एकतर पटेलाना नाकारावं लागतं नाही तर बाबूंना! पण हा इतिहासच त्यांना माहित नसल्यानं ते दोघांनाही तितक्याच राजकीय आत्मियतेनं कवटाळतात...
सोशल मीडियाची वाटचाल अँटी सोशलतेकडे | डूग्गु सापडला मात्र शोधपत्रिका जीवावर बेतली असती
मोठी बातमी, विशेष लेख

सोशल मीडियाची वाटचाल अँटी सोशलतेकडे | डूग्गु सापडला मात्र शोधपत्रिका जीवावर बेतली असती

रोहित आठवले घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावरून अपहरण झालेला मुलगा पूनावळे येथे बांधकाम साईट वर सोडून देण्यात आला. पिंपरी चिंचवडकरांनी अंडरवर्ल्डचा अपहरणाशी संबंध ते अनेक प्रकरणात कोर्टात कुटुंबाने साक्षी फिरवण्याच्या घटना पाहिल्या आहेत. डूग्गुला पूनावळेमध्ये कोणी सोडले. या प्रकरणात जवळच्या कोणाचा सहभाग आहे का हे पोलिसांच्या तपासातून पुढे येईल. पण तो पर्यंत सोशल मीडियावर झालेला अतातायीपणा कसा घडला आणि आरोपी कुठे कुठे फिरला ते वाचूयात... डूग्गुच्या जीवावर बेतणारे आणि पोलिसांना तपासात व्यत्यय येईल असे अँटी सोशल काम सोशल मीडियाद्वारे अनेकांनी मागील काही दिवसात केले आहे. पत्रकारांना बातमीची कायमच जीवघेणी स्पर्धा असतानाही एकानेही ब्रेकिंग अथवा तपास कसा सुरू आहे, तपास का थंडावला, तपासात कुठे कोण चुकले या बातम्या केल्या नाहीत. याला दोन तीन अपवादही ठरले....