मोहम्मद पैगंबर बिलाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादमध्ये १४ मार्चला जाहीर सभा
.
वंचितचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर, रेखा ठाकूर यांची उपस्थिती
औरंगाबाद : धार्मिक प्रतिकांचा गैरवापर करून दंगल घडविण्याचे षड्यंत्र करणाऱ्या विरोधात कडक कायदा करण्या साठी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैगंबर बिल सादर केले आहे या बिलाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादेत 14 मार्च रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद व मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष जावेद कुरेशी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना फारूक अहमद म्हणाले हमखास मैदानावर सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर प्रा अंजलीताई आंबेडकर मुस्लिम धर्मगुरू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हिंदू-मुस्लीम यांच...