आंध्र प्रदेशातून चक्रीवादळ कर्जत-जामखेडमार्गे चाललं मुंबईला
अहमदनगर : पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आंध्र ते मुंबई व्हाया नगर, असा प्रवास भूभागावरून करीत अरबी समुद्रात जाणार आहे. एका समुद्रातून निघालेले वादळ भूभागावरून मार्गक्रमण करीत दुसऱ्या समुद्रात जाणे, याकडे दुर्मिळ घटना म्हणून पाहिले जात आहे.
तत्पूर्वीच उत्तर भारतातून निघालेल्या परतीच्या पावसाचे गार वारे महाराष्ट्रात पोचले आहे. चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त हवा तयार झाली. परतीच्या पावसाचे गार वारे त्यात मिसळले. त्यामुळे सध्या राज्यभर दमट हवामान तयार झाले. त्यात चक्रीवादळाचा प्रवास दक्षिण नगर जिल्ह्यातून होणार असल्याने, येत्या बुधवारी व गुरुवारी या भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हवामानातील हे बदल अनाकलनीय असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
जलसंपदा विभागाकडे ब्रिटिश काळापासून गेल्या १०० वर्षांतील पाऊस व त्याच्या प्रवासाच्या ठळक नोंदी आहेत. मा...










