तबलिघी जमातीला बनवल बळीचा बकरा | FIR रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश
File Photo
नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिल्लीतील निझामुद्दीन मरकझ प्रकरणातील तबलिघी जमातच्या (Tablighi Jamaat) देश आणि परदेशातील तबलिघींविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. शनिवारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.
करोना काळात तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवल आहे. सोबतच चुकीचं वार्तांकन करणाऱ्या मीडियाला फटकारताना, या लोकांना फैलावलेल्या संक्रमणासाठी आरोपी ठरवण्याचा प्रोपोगंडा चालवण्यात आल्याचंही न्यायालयानं म्हटलंय.
यावेळी, दिल्लीच्या मरकझमध्ये आलेल्या परदेशी लोकांविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठा प्रोपोगंडा चालवण्यात आला. भारतात फैलावणाऱ्या कोविड १९ संक्रमणाचा जबाबदार हे परदेशी लोक आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आलं असं न्यायाल...